राष्ट्रीय वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत शुभम तोडकर याला सुवर्णपदक

दि. ०४/०१/२०२३
वडगाव मावळ


वडगाव मावळ : राष्ट्रीय वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धा तामिळनाडूतील नागरकोईल येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत वडगाव मावळ येथील खेळाडू शुभम तानाजी तोडकर याने ६१ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.

या स्पर्धेत रेल्वे संघाकडून खेळताना शुभमने ११९ किलो स्नॅच, १५२ किलो क्लिनजर्क असे एकूण २७१ किलो वजन उचलून प्रथम क्रमांक प्राप्त केला. शुभम वयाच्या बाराव्या वर्षापासून वेटलिफ्टिंग करत आहे. आगामी काळात कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा, ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा खेळणे हे त्याचे लक्ष्य आहे. त्यादृष्टीने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्याची तयारी व सराव देखील सुरू आहे.कुटुंबाच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे शुभमला सुरुवातीला काही काळ कष्ट करावे लागले. तरीही त्याने जिद्ध कधी सोडली नाही. त्याचमुळे आज त्याला यश मिळत आहे.आमदार सुनील शेळके यांचे आर्थिक पाठबळ व प्रशिक्षक ऍड. रवींद्र यादव व विक्रमसिंह देशमुख, नितीन म्हाळसकर, सचिन ढोरे यांचे त्याला मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. शुभमचा संघर्ष, जिद्द आणि चिकाटी पाहून दोन वर्षांपूर्वी त्याला रेल्वेमध्ये नोकरी मिळाली. त्याच्या या यशाचे तालुक्यातून कौतूक होत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *