भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटीला

२५ सप्टेंबर २०२२

भोसरी


भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तथा आमदार महेश किसनराव लांडगे, उद्योजक कार्तिक किसनराव लांडगे आणि टाटा मोटर्स चे कामगार नेते सचिन किसनराव लांडगे यांच्या मातोश्री आणि पै. किसनराव लांडगे यांच्या पत्नी हिराबाई किसनराव लांडगे (वय ६५) यांचे २४ सप्टेंबर रोजी शनिवारी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

आज दि २५ सप्टेंबर रोजी रविवारी त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी सांत्वन करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार महेश लांडगे यांच्या घरी भेट देऊन लांडगे परिवाराच्या दुःखात सहभागाची भावना वेक्त केली.

त्यांच्या सोबत आमदार शिवेंद्र राजे भोसले, आमदार राहुल कुल, आमदार माधुरी मिसाळ, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार बाळा भेगडे , माजी नगरसेवक शंकर जगताप, प्रदेश मंत्री अमित गोरखे, उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *