पिंपळे निलख मधिल पाणी प्रश्न पेटला, पुरवठा सुरळीत करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा : सचिन साठे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१७ मार्च २०२२

पिंपरी


विशालनगर पिंपळे निलख भागातील पाणी पुरवठा सुरळित करा अन्यता कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करु असा इशारा महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे यांनी इशारा दिला. बुधवारी (दि. १६ मार्च) सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली पिंपळे निलख मधील नागरिकांच्या शिष्टमंडळाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांना निवेदन दिले. यावेळी माजी पोलिस पाटील भुलेश्वर नांदगुडे, विजय जगताप, भरत इंगवले, संजय बालवडकर, अनंत कुंभार, काळुराम नांदगुडे, संजय पटेल आणि अनिल संचेती आदी उपस्थित होते.


आयुक्त पाटील यांना दिलेल्या निवदेनात पुढे म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये बहुतांशी सर्वच भागात कमी दाबाने आणि अवेळी पाणी पुरवठा केला जात आहे. विशेषता पिंपळे निलख आणि विशाल नगर भागात हि समस्या तीव्र आहे. वेळी अवेळी आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे विनाकारण सोसायटी आणि चाळीमधील नागरिकांना टँकरने पाणी घ्यावे लागत आहे. नियमितपणे मिळकत कर आणि पाणी पट्टीकर भरणा-या नागरिकांवर हा अन्याय आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना नाहक मनस्ताप होत आहे. मागील एक महिन्यापासून या परिसरातील नागरिकांनी येथिल नगरसेवकांकडे पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी अनेकदा पाठपुरवठा केला आहे. परंतू नागरिकांना न्याय मिळाला नाही. विशाल नगर पिंपळे निलख परिसरातील पाणी पुरवठा नियमितपणे पुर्णदाबाने व्हावा यासाठी आपण स्वता: लक्ष द्यावे व येथिल करदात्या नागरिकांना दिलासा द्यावा. अन्यथा कॉंग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे यांनी यामध्ये दिला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *