एकनाथ शिंदे सध्याचे नवे हिंदुहृदयमसम्राट; नाना पटोले यांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२४ सप्टेंबर २०२२


शिवाजी पार्क मैदानावरील नियोजित दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला परवानगी नाकारणारा मुंबई महापालिकेचा निर्णय अयोग्य आणि कायदेशीर प्रक्रियेचा उघडउघड दुरुपयोग असल्याची टिप्पणी करीत उच्च न्यायालयाने शुक्रवारी तो रद्द केला आणि मेळावा घेण्याची परवानगी ठाकरे यांना दिली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दसरा मेळावावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. नाना पटोलेंनी एकनाथ शिंदेंना सध्याचे नवे हिंदुहृदयमसम्राट म्हणत टोला लगावला आहे.

राज्यातील सरकार हे स्वत:च कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत आहे. विजयादशमीच्या दिवशी शिवाजीपार्कवर शिवसेनेचा दरवर्षी मेळावा होतो, जो बाळासाहेब ठाकरेंपासून होतोय. काँग्रेसच्या राजवटीत ते काँग्रेसवर टीका करायचे परंतु तरी जी परंपरा त्यांनी ठरवली, त्या परंपरेला काँग्रेस पाठिंबा दर्शवायचा. सध्या जे नवीन हिंदुहृदयमसम्राट झालेले आहेत तेच हिंदूंच्या व्यवस्थेला विरोधत करताना आपण पाहत आहोत असेही नाना पटोले म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *