उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२२ सप्टेंबर २०२२


शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील गटनेत्यांच्या मेळाव्यात भाजपावर सडकून टीका केली. भाजपाने पक्षात केवळ उपरे भरून ठेवले आहेत की आता तुमचे बावनकुळे की एकशे बावनकुळे हेच कळत नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. भाजपामुळे विधानसभा निवडणूक जिंकल्यावर उद्धव ठाकरेंनी तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी विश्वासघात केला. विश्वासघातामुळे जनतेने त्याना वारंवार धडा शिकवलाय. ग्रामपंचायतीत काय झाले पाहा. उरलेला करेक्ट कार्यक्रम महापालिका निवडणुकीत करू. तयार राहा, अमीत शाह भाईंवर टीका करण्यापूर्वी आधी स्वतःला सांभाळा. विश्वासघात करून तुमच्या कुळाला बट्टा लावलात ते आधी पाहा, अशा शब्दात बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

 

तसेच उद्धव ठाकरे हे वारंवार माझ्या कुळाचा कुत्सितपणे उल्लेख करतात. माझे वडील शेतकरी आहेत. आई वडिलांनी मोठ्या कष्टातून मला घडविले. केवळ त्यांच्या कष्टाचा, संघर्षाचा वारसा मला मिळाला आहे. दुसरे काही नाही. गरीब शेतकऱ्याच्या पोटी जन्मास येणे गुन्हा आहे का? माझ्या कुळाचा उद्धार करून उद्धव ठाकरे यांचे नैराश्य दूर होत असेल तर तो माझ्या कुळाचा सन्मानच आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *