कैलास बोडके (प्रतिनिधी)
खामुंड़ी ता. जुन्नर गावात मनोरुग्णासारखे हावभाव करणारी व्यक्ती दगड गोटे मारत असल्याची माहिती गावचे सरपंच वनराज शिंगोटे यांनी पत्रकार कैलास बोडके यांना देऊन सहकार्य करा असे सांगितले बोडके यांनी त्यांचे मित्र जे कायम निस्वार्थपणे कुठल्याही प्रकारे एक रुपयांची अपेक्षा न ठेवता मनोरुग्णांना आधार देऊन त्यांच्या घरचा पत्ता शोधून त्याला घरपोच करणारे पिंपरी पेंढार गावचे नितीन शेलार आणि ओतूर पोलिसांनी त्यास कुटुंबाकडे सुपुर्त केले.
शेलार यांनी त्या मनोरुग्णाची पार्श्वभूमी जाणून घेताना त्या रुग्णाने आपले नाव सलमान रफिक शेख गाव शांती नगर खोपोली फाटा रूम नंबर 13 असं सांगितल परंतु त्या ठिकाणी लगेच संपर्क होऊ शकला नाही ओतूर पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस नाईक महेश पठारे व ताऊजी दाते यांच्या सहकार्याने आळेफाटा येथील सुमन पुनर्वसन व व्यसन मुक्ती केंद्राचे संचालक मानसोपचार तज्ञ डॉ. निखिल कणसे यांना संपर्क करून त्या दवाखान्यात दाखल केले. कणसे यांनी एकही रुपयाची अपेक्षा न ठेवता त्या रुग्णाची सेवा केली. मनोरुग्ण असल्याने त्या रुग्णाच्या नातेवाईकांचा शोध घेणे कठीण होते परंतु शेलार यांनी हार मानली नाही. त्यांनी सर्व सोशल मिडिया वर या सदर इसमाला कुणी ओळखत असाल तर संपर्क करा असे आवाहन केले. अखेर त्या रुग्णाच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात यश मिळाले. सध्याच्या युगात पुन्हा एकदा शेलार यांच्या कार्याने माणुसकी कुठतरी जिवंत असल्याचं पाहायला मिळते. त्या रुग्णाच्या नातेवाईकांकडून रुग्णाची ओळख पटवून ओतूर पोलिसांच्या सहकार्याने त्याला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मनोरुग्णांना आधार देणारे आणी त्यांची निशुल्क सेवा करणारे शेलार यांचे ग्रामस्थाकडून कौतुक होत आहे.