चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

रविंद्र खुडे
विभागीय संपादक 
२३ सप्टेंबर २०२२

शिरुर


शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथे दि. २३ सप्टेंबर २०२२ रोजी पहाटे ३.०० वा. चे पुर्वी मौजे म्हसेफाटा , टेमकरवस्ती, टाकळीहाजी, ता. शिरूर, जि. पुणे गावचे हद्दीत, ललीता महादेव काळे हीचे राहते घरामध्ये तीचा नवरा महादेव सुरेश काळे रा. मुळगाव सोगाव पश्चिम, ता. करमाळा, जि. सोलापुर, (सध्या रा. म्हसेफाटा , टेमकरवस्ती, टाकळीहाजी, ता. शिरूर, जि. पुणे), याने त्याची बायको ललीता महादेव काळे, वय ३५ वर्ष हीला तीचे चारीत्र्यावर संशय घेवुन, कु-हाडीने तीच्या चेहर्‍यावर तोंडाजवळ, डाव्या हाताच्या मनगटाजवळ व उजव्या हातावर वार करून, तीचा खून करून मोटारसायकलवरून पळून गेला आहे. त्यामुळे त्याच्याविरूध्द मयताची बहीण चांदणी पवार यांनी शिरूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून, त्याप्रमाणे शिरूर पोलीस स्टेशन येथे गु र क्र 642/2022, IPC 302 प्रामाणे गुन्हा दाखल केला असून, सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांचे मार्गदर्शनाखाली, सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर हे करत आहेत. सदरचा आरोपी पकडण्यासाठी शिरूर पोलीस स्टेशन ने दोन पथके तयार केली आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *