शिवाजी पार्क म्हणजे शिवसेना हेच समीकरण – शरद पवार

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१९ सप्टेंबर २०२२


दसरा मेळाव्यासाठी दादरचे शिवाजी पार्क मैदान मिळविण्याकरिता शिवसेना आणि शिंदे गटामध्ये रस्सीखेच सुरू असून मुंबई महापालिकेने कोणाला परवानगी द्यायची याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे, वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदान मिळावे याकरिता शिंदे गटाने केलेला अर्ज ‘एमएमआरडीए’ने स्वीकारला आहे.असून शिवसेनेने ज्या मैदानासाठी अर्ज केला ते आरक्षित असल्याने फेटाळण्यात आहे. त्यातच आता शिवाजी पार्क म्हटल की शिवसेना हेच समीकरण आहे,असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केलं आहे.

बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात कार्यरत आहे. दसरा मेळावा घेण्याची त्यांची परंपरा आहे, ती लक्षात घेता शिवसेनेनी केलेली मागणी गैर नाही. एकनाथ शिंदेंना दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे, तेदेखील घेऊ शकतात. त्याच्यासाठी त्यांनी बीकेसीचं मैदान मागितलं आणि त्यांना ते मिळालं आहे. त्यामुळे दुसऱ्यांना विरोध करण्याचं काही कारण नाही. शिवसेनेलाही परवानगी देणं आवश्यक आहे असं शरद पवार म्हणाले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *