गुळुंचवाडी डोंगरावर आढळला बेपत्ता वृद्ध महिलेचा मृतदेह

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
१० सप्टेंबर २०२२

बेल्हे


गुळुंचवाडी (ता.जुन्नर) येथील १० दिवसांपासून बेपत्ता असणाच्या वृद्ध महिलेचा मृतदेह डोंगरावर आढळून आला असून वन्य प्राण्यांने खाल्लेल्या अवस्थेत आढळून आला असल्याची फिर्याद आळेफाटा पोलिसांत देण्यात आली आहे. गुळुंचवाडी (ता.जुन्नर) येथील हिराबाई होनाजी काळे (वय ६५) या रोज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये शेळ्या चारण्यासाठी बांधूडे डोंगराकडे घेऊन जात असत. सायंकाळी पाचच्या सुमारासह घेऊन घरी येत असत. मात्र दि.३० ऑगस्ट सकाळी दहा वाजता नेहमीप्रमाणे शेळ्या चारण्यासाठी डोंगरावर निघून गेल्या असता सायंकाळी पाच वाजून गेले तरी घरी आल्या नाही. म्हणून घरातील सर्व जणांनी शेतात आजूबाजूला परिसरात शोध घेतला. शेळ्या मिळून आल्या परंतु हिराबाई आढळल्या नाहीत.घरातील मंडळींनी सर्व नातेवाईकाकडे शोधाशोध केली. ७ सप्टेंबर रोजी आळेफाटा पोलिसांत नातेवाईकांनी हरवल्याची खबर दिली.

८ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास नातेवाईक व ग्रामस्थांनी डोंगरावर शोधाशोध सुरू केली.शोधत असताना बांधुडे डोंगरावर एका झाडाला हिरव्या रंगाची साडी दिसली.व बाजूला शरीराचे अवशेष दिसले. नातेवाईकांनी अवशेष व साडी ओळखली. एखाद्या जंगली प्राण्यांनी खाल्ल्याचा अंदाज होता त्यानंतर नातेवाईकांनी वन खात्याचे अधिकारी व पोलिसांना कळविले असता सदर ठिकाणी आले. अशी खबर आळेफाटा पोलीस स्थानकामध्ये संतोष होनाजी काळे (वय २५) यांनी दिली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *