खेळायला जातो म्हणून घराबाहेर पडला अन् २९ तासांनी ७ वर्षीय मुलाचा मृतदेहच सापडला

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१० सप्टेंबर २०२२

पिंपरी


पिंपरी येथील मासुळकर कॉलनीतुन बेपत्ता झालेल्या 7 वर्षाच्या मुलाचा आज मृतदेह आढळून आलेला आहे. हा नक्की काय प्रकार आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. हा अपहरण, खुनाचा प्रकार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.अपहरणकर्त्यांकडून 2 कोटींची मागणी करण्यात आली होती असल्याचे बोलले जाते. आदित्य गजानन ओगले (7, रा. ग्रीन फिल्ड सोसायटी, उद्यमनगर, मासुळकर कॉलनी, पिंपरी) असे मृतदेह आढलेल्या मुलाचे नाव आहे. आदित्य हा गुरुवारी सायंकाळी ७.१५ वाजल्यापासून बेपत्ता होता.

मसुळकर , अजमेरा, मोरवाडी येथील नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांनी आदित्यचा शोध घेण्यासाठी तो हरवला असल्याचे विविध व्हाट्सअँप ग्रुप वर पाठवले होते. ही बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली होती. आदित्य बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. सर्व ठिकाणी, वेगवेगळ्या पथकाच्या सहायाने तपास केला. शुक्रवारी रात्री उशिरा एमआयडीसी परिसरात एक कंपनीच्या टेरेस वर आदित्य याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी हा नक्की काय प्रकार आहे याचा शोध सुरू केला आहे. आदित्य च्या जाण्याने परीसरात शोककळा पसरली असून सगळीकडे हळहळ वेक्त करण्यात येत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *