महाराष्ट्राच्या मराठमोळ्या पुरुश्रुत खिलारीने जिंकली जगातील एक खडतर अशी ४थी द ग्रेट हिमालयन अल्ट्रा ६०० किलोमीटर सायकलिंग रेस

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०१ सप्टेंबर २०२२


२७ ते २८ ऑगस्ट २०२२ दरम्यान ‘ इन्सपायर इंडिया ‘ संस्थे तर्फे घेण्यात येणारी लेह-कारगिल-द्रास-लेह अशी ६०० किमीची अत्यंत खडतर सायकलिंग रेस मोठ्या जिद्दीने पुणे जिल्ह्यातील नारायणगाव च्या, नवीमुंबई मधील पुरूश्रृतने जिंकली. कारण ही शर्यत अशा उंचीवर आहे जिथे ऑक्सिजनची पातळी तुलनेने कमी आहे आणि काहीवेळा तुम्हाला कमी तपमानाला तसेच वेगवान थंड वाऱ्याचा ,त्रास वाटणाऱ्या सूर्य किरणांचा ही सामना करावा लागतो, त्यामुळे अशा कार्यक्रमाचा हा पुरुश्रुत चा येथे पहिलाच प्रयत्न असल्याने त्याच्या कामगिरीचे बरेच कौतुक करावे लागेल. यापूर्वी पुरूश्रृतने सह्याद्री क्लासीक आणी डेक्कन क्लिफ हँगर नांवाच्या बहुश्रृत अल्ट्रा रेस पूर्ण केल्यात. सह्याद्री क्लासिक रेस मधील अंतर श्रेणी 190 किमी लांबीची आहे आणि एकूण उंची 3420 मीटर आहे. तर, भारतातील सर्वोत्कृष्ट RAAM क्वालिफायरची – डेक्कन क्लिफहॅंजर स्पर्धा पुणे ते गोवा वार्षिक ६४३ किमी (४०० मैल) अल्ट्रा सायकलिंग शर्यत, RAAM पात्रता आहे. सर्व श्रेणीतील सर्व रेसर्सकडे सपोर्ट व्हेईकल आणि क्रू असणे आवश्यक असते.

वेळेच्या मर्यादेत पूर्ण करणारे सोलो रेसर्स जगातील सर्वात कठीण सायकल शर्यतीसाठी पात्र ठरतील – रेस अक्रॉस अमेरिका

सायकलचे शहर असलेल्या पुण्यात ही शर्यत सुरू होते आणि समुद्र किनारी गोव्यात संपते. भारतातील सर्वोत्कृष्ट RAAM क्वालिफायरची – डेक्कन क्लिफहॅंजर स्पर्धा पुणे ते गोवा वार्षिक ६४३ किमी (४०० मैल) अल्ट्रा सायकलिंग शर्यत, RAAM पात्रता आहे. सर्व श्रेणीतील सर्व रेसर्सकडे सपोर्ट व्हेईकल आणि क्रू असणे आवश्यक असते.वेळेच्या मर्यादेत पूर्ण करणारे सोलो रेसर्स जगातील सर्वात कठीण सायकल शर्यतीसाठी पात्र ठरतात – रेस अक्रॉस अमेरिका. सायकलचे शहर असलेल्या पुण्यात ही शर्यत सुरू होते आणि समुद्र किनारी गोव्यात संपते. पण आताच्या या ४थी द ग्रेट हिमालयन अल्ट्रा ६०० किलोमीटर सायकलिंग रेसमध्ये पहाटे ५.३० वाजता सुरुवात केलेल्या पुरुश्रुतने लगातार १ ल्या क्रमांकाने घोडदौड करीत रात्री १२.३० ला सक्तीची रेस्ट घेतली. त्यानंतर ३.५५ मिनटाने पुन्हा सुरवात केली. मध्ये मागील रेसर पुढे गेला पण तरीही पुरू ने बाजी मारून सायंकाळी ४.३० घ्या दरम्यान मोहीम फत्ते केली.

या मोहीमेत पुरूची काळजी घेण्यासाठी सोबत असलेल्या ४ जणांच्या सहाय्यक दलामधे त्याचे आईवडील आणि दोन रेसचे अनुभवी तरूण नीरल खिरानी आणि वेदांत बांबर्डेकर होते .यांनी रेस सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून राहीले.त्याची आई धावत्या गाडीत पुरू साठी ज्युसेस, लिक्वीड तयार करून वेळोवळी खाऊ घालत होती, तर वडील संपूर्ण व्हिडिओ शूटिंग करून सर्वांनाच रेसचा थरारक अनुभव देत होते , तर मित्र अन्य गरजा पूर्ण करीत होते. रेसरला थकविणारा पण त्याला रोमांचित करणाऱ्या अशा ग्रेट हिमालयन अल्ट्रा रेस मधे प्रथम क्रमांक पुरुश्रुत संजय नूतन खिलारी याने ३४ तास १७ मिनिट २९ सेकंड वेळ घेत पूर्ण केली. तर ३५ तास ४३ मिनिट ४३ सेकंड वेळ घेत मुस्तफा अलीअसगर पत्रावाला हे द्वितीय क्रमाकांवर राहिले. आणि कोलकत्ता चे राहुल पॉल यांनी ३९ तास २३ मिनिटे वेळ घेत तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

पुरुश्रुतचा आत्मविश्वास खूप दुणावला असून‌ लवकरच त्याने अल्ट्रा रेस स्पाइस १७५० किमी च्या गोवा-उटी-कुर्ग- गोवा अशा जानेवारी २०२३मधे होणारया रेस मधे भाग घेण्याचा मनोदय जाहीर केला. या स्पर्धेसाठी पुरू ने विज्युलायजेशन , माईंड थाॅट पावरचा उपयोग केला. यासाठी स्पोर्टस कौंसैलर बीके जयश्री दिदीचे पण सहकार्य लाभले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *