आळेफाटा येथे एसटी बस व टेम्पोची धडक

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
१९ सप्टेंबर २०२२

आळेफाटा


आळेफाटा येथे पुणे-नाशिक महामार्गावर एसटी बस व आयसर टेम्पो यांची समोरा समोर धडक होऊन बस चालक व चार प्रवाशी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या बाबत आळेफाटा पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार दि.16 रोजी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावरील आळेफाटा (ता .जुन्नर) येथील श्री स्वामी समर्थ मंदिराचे समोर एसटी बस क्रमांक MH 14 BT 3335 ही पुणे येथून इगतपुरी येथे जात असताना समोरून येणारी आयशर टेम्पो क्रमांक MH 43 U 5296 यावरील चालक सचिन प्रकाश मुळे (येडगाव ता.जुन्नर जिल्हा पुणे) यांच्यात समोरासमोर धडक होऊन एसटी बस चालक गोविंद बाबुराव पगारे (वय 38 वर्ष रा.घोटी ता इगतपुरी जि. नाशिक) यांना किरकोळ दुखापत झाली तसेच बस मधील तीन महिला प्रवाशी व एक पुरुष प्रवासी जखमी झाले. तसेच एसटी बस तिचे ही नुकसान झाले. आयशर टेम्पो चालक सचिन प्रकाश मुळे याचे विरुद्ध कायदेशीर फिर्याद संतोष घोंगडे वय-३२ (रा.इगतपुरी,जि.नाशिक)यांनी आळेफाटा पोलिसांत दिली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *