आळे गावात ७ हजार मुले व नागरिकांचे समूह राष्ट्रगीत गायन संपन्न

रामदास सांगळे
विभागीय संपादक

१८ ऑगस्ट २०२२


आळे (ता.जुन्नर) गावचे सरपंच प्रितम काळे उपसरपंच अॅड विजय कुऱ्हाडे व सर्व सदस्यांनी गावातील सर्व संस्था आजी माजी पदाधिकारी मान्यवर व परिसरातील सर्व शाळांच्या सहभागाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा केला. १५ ऑगस्ट रोजी सार्वजनिक ध्वजारोहणाला सात हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले व विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ज्ञानदिप सभागृहात संपन्न झाला. अॅड विजय कुऱ्हाडे यांना झेंडावंदनाचा मान मिळाला, प्रसंगी अनेक मान्यवर, शालेय मुले, ग्रामस्थ उपस्थित होते. दि १७ रोजी सर्व शांळांमधील गट निहाय विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या, बरोबर ११ वा सात हजारहून अधिक विद्यार्थी ग्रामस्थांच्या उपस्थितीत समूह राष्ट्रगीत गायन संपन्न झाले. प्रसिद्ध व्याख्याते गणेशजी शिंदे यांचे व्याख्यान संपन्न झाले. जि प सदस्य शरद लेंडे, पं स सदस्य मा जिवन शिंदे, शाम माळी, माजी पं स सदस्य नेताजी डोके, बाळासाहेब गुंजाळ, उल्हासजी सहाणे, सुधाकर काळे, मुकूंद भंडलकर, ज्याोती शिंदे, जयश्री डावखर, सोनाली वाघोले, सविता भुजबळ, रज्जूभाई मोमिन, मंगल तितर, लता वाव्हळ, अर्चना गुंजाळ, गौरी भंडलकर, उर्मिला कुऱ्हाडे, मंगेश कुऱ्हाडे, दिगंबर घोडेकर, सर्व ग्रा पं सदस्य उपस्थित होते, उपसरपंच तथा प्रभारी सरपंच अॅड विजय कुऱ्हाडे यांनी सर्वांचे स्वागत केले,शरद लेंडे यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.मान्यवरांच्या हस्ते वक्तृत्व स्पर्धेच्या विजेत्यांना सन्मानचिन्ह, रोख रक्कम बक्षीस, प्रशस्तिपत्रक, देण्यात आले. एकाच वेळी सात हजार विद्यार्थ्यानी समूह राष्ट्रगीत सादर केल्याने सर्वत्र उपक्रमाचे कौतुक होत आहे. परिसरातील अनेक मान्यवर ग्रामस्थ प्रसंगी उपस्थित होते.या कार्यक्रमात, ज्ञानराज इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्यू काॅलेज,ज्ञानमंदीर हायस्कूल व ज्यू काॅलेज, मा बाळासाहेब जाधव कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, विशाल जुन्नर सेवा मंडळाचे फार्मसी काॅलेज, आळेफाटा उर्दू स्कूल, जे आर गुंजाळ इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्यू काॅलेज, जे व्ही पाटील स्कूल, जयहिंद नर्सिंग काॅलेज, हांडे देशमुख स्कूल व ज्यू काॅलेज , गावातील सर्व जि प प्राथ शाळा आदी शाळा महाविद्यालयांनी उत्फुर्तपणे सहभाग नोंदविला.

कार्यक्रमासाठी विविध समिती सदस्यांनी परिश्रम घेतले, बी जे काॅलेज व ज्ञानमंदीर हायस्कूल व ज्यू काॅलेजव सर्वच शिक्षकांनी नियोजनानुसार उत्तम जबाबदारी सांभाळली. प्राचार्य डाॅ प्रविण जाधव, डाॅ अरूण गुळवे, डाॅ जयसिंग गाडेकर, लांडगे, अमोल कापसे, स्मिता जाधव, यांनी वक्तृत्व स्पर्धेचे परिक्षक म्हणून उत्तम काम केले.

डाॅ संजय वाकचौरे, प्रा गरड, मुख्याध्यापक संजय पावडे सर, डी के गुंजाळ, जयसिंग जाधव सर, प्रणव काळे, संतोष शिंदे, अभिजित भुजबळ, निवृत्त शिक्षिका सुनिता वाव्हळ, गंगा गुरकुले, सर्व ग्रा पं कर्मचारी, यांनी विशेष परिश्रम घेतले व कार्यक्रमात उत्फुर्तपणे जबाबदारी सांभाळली.

प्रसंगी गावातील विविध संस्थांचे अनेक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *