देशाच्या विकासात महिलांचा सहभाग महत्वाचा – आरोटे

अहमदनगर / प्रतिनिधी
दि.08/03/2021

देशाच्या विकासासाठी सर्व क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग हा अतिशय महत्वाचा असून महिलांनी चुल आणि मूल या पलीकडे जावून समाजासाठी योगदान द्यावे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्‍वासराव आरोटे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त अकोले तालुक्यातील कर्तृत्वान नारी शक्तीचा सन्मान करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्‍वासराव आरोटे बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, तालुका सचिव प्रा. विद्याचंद्र सातपुते, कार्यालय प्रमुख निखिल भांगरे, कार्यकारीणी सदस्य छाया चित्रकार संदिप देशमुख आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील योगदानासाठी अकोले सोसायटीच्या कार्यकारीणी सदस्या तथा कन्या विद्यामंदिराच्या स्थानिक स्कूल कमिटीच्या अध्यक्षा सौ. कल्पनाताई सुरपुरीया, वैद्यकिय क्षेत्रात डॉ. सौ. ज्योती भांडकोळी, महसूल विभागाचा उत्कृष्ठ तलाठी पुरस्कार विजेत्या सोनाली वलवे- देशमुख, ग्रामविकास विभागाचा उत्कृष्ठ ग्रामसेविका पुरस्कार विजेत्या सौ. जयश्री काशिद – शेळके, कायदेविषयक विधीतज्ञ अ‍ॅड. सौ. शोभा गंवादे या पाच महिलांचा सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ, पेन, मिठाई देवून सन्मानित करण्यात आला.

अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून तालुक्यातील युवक व युवतींसाठी उच्च शिक्षणाची सोय व्हावी या हेतूने सुरु करण्यात आलेल्या पॉलीटेक्नीक, एमबीए, एमसीए च्या उभारणीमध्ये सौ. कल्पनाताई सुरपुरीया यांनी मोठे योगदान दिले आहे, तसेच त्यांच्या स्थानिक स्कूल कमिटीच्या अध्यक्षा म्हणून काम करत असताना कन्या विद्यालयाचा मोठा काया पालट झाला आहे. परफेक्ट इंग्लिश मिडीयम स्कूलच्या उभारणीमध्ये सौ. सुरपुरीया यांचे योगदान आहे. आयटीआय पुर्नजीवन करण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला, त्यांच्या या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.

आदिवासी व ग्रामीण भागातील आदिवासी महिला सौ. डॉ. ज्योती भांडकोळी यांनी वैद्यकिय पदवी धारण करुन सर्व महिलांना आदर्श घालून दिला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा अतिशय मनोभावे रुपी करीत आहेत, या वैद्यकिय क्षेत्रातील कामकाजाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.

यावर्षीचा शासनाचा उत्कृष्ठ तलाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या सौ. सोनाली वलवे – देशमुख, तसेच उत्कृष्ठ ग्रामसेविका पुरस्कार प्राप्त सौ. जयश्री काशिद- शेळके यांच्या उत्कृष्ठ कार्याबद्दल यावेळी त्यांनाही सन्मानित करण्यात आले.

कायदेविषयक क्षेत्रामध्ये गोरगरीब महिलांसाठी न्याय देण्याचे काम तसेच मोफत कायदेविषयक सल्ला देण्याचे काम अ‍ॅड. सौ. शोभा गवांदे हे करीत आहे, तसेच वकील बार संघाच्या विविध उपक्रमामध्ये त्यांचा हिरहिरीने सहभाग असतो, त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना यावेळी राज्य पत्रकार संघाच्यावतीने सन्मानित करण्यात आले.

सुत्रसंचालन जिल्हा प्रसिध्दी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे यांनी तर आभार प्रा. विद्याचंद्र सातपुते यांनी मानले.
सौ. सुरपुरीया यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने नारीशक्तीचा झालेला सन्मान हा आयुष्यात कायम स्वरुपी आठवणीत राहील. या पुरस्कारामुळे निश्‍चितच यापेक्षाही उत्कृष्ठ काम करण्यास प्रेरणा मिळेल. यापुर्वी असा नारीचा सन्मान होणे अपेक्षित होते, मात्र ती उणीव राज्य पत्रकार संघाने भरुन काढली, त्यामुळे पत्रकार संघाचे आम्ही आभार मानतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *