शिरूरचे पो नि सुरेशकुमार राऊत यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झाल्याने रामलिंग महिला उन्नती बहु. सामाजिक संस्था व दक्षता समितीच्या वतीने त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार

रवींद्र खुडे
विभागीय संपादक 
१८ ऑगस्ट २०२२

शिरूर


पिंपरखेड येथील दरोडा प्रकरणात ग्राहक व कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून, दरोडेखोरांनी सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असे मिळून सुमारे अडीच कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल लुटून नेला होता. शिरूर पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान निर्माण झालेल्या या प्रकरणात, पोलीस निरीक्षक राऊत यांनी दिवस-रात्र एक करून या तपासात महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. यातील गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून दोन कोटी ३६ लाख ४२ हजार ९६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला होता. या गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासाबाबत, शीरूर पो स्टे चे पोलीस निरीक्षक व या गुन्ह्याचे तपासीय अधिकारी सुरेशकुमार राऊत, यांची केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पदकासाठी शिफारस करण्यात आलेली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक राऊत यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झालेले आहे. हे पदक जाहीर झाल्याने १५ ऑगस्ट २०२२ रोजी, पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या हस्ते, राऊत यांना पुणे येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलाय. तर, मुख्य पदक वितरण समारोह कार्यक्रम पुढील येत्या काही दिवसांत होणार आहे.

“पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना मिळालेल्या या पदकामुळे शिरूर पो स्टे च्या व शिरूरच्या मानात विशेष भर पडल्यामुळे, शिरूरकरांसाठी ही अभिमानास्पद बाब असल्याचे, रामलिंग महिला उन्नती केंद्र व सामाजिक संस्था तसेच महिला दक्षता समिती शिरूर पो स्टे च्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मत व्यक्त केले. या कामगिरीबाबत पोलीस निरीक्षक राऊत यांचा या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन बुधवार दि. १७ ऑगस्ट २०२२ रोजी शिरूर पोलीस स्टेशन येथे सत्कार करण्यात आला. यावेळी शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी यांनीही, शिरूर पो स्टे चे पो नि राऊत यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. हा सन्मान रामलिंग महिला उन्नती संस्थेच्या अध्यक्षा तसेच महीला दक्षता समिती, शिरूर पो स्टे. अध्यक्षा राणी कर्डिले, महीला दक्षता समिती उपाध्यक्षा शशिकला काळे, महीला दक्षता समिती सदस्या ऍड सीमा काशीकर, कविता वाटमारे, छाया हारदे, राणी शिंदे, जया खांडरे, ललिता पोळ, डॉ स्मिता कवाद, प्रतीक्षा पवार, शेख भाभी, दिपाली आंबरे, निर्मला आबुज, सालेहा शेख यांच्या वतीने करण्यात आलाय.

पो नि सुरेशकुमार राऊत यांनी या आधी शिरूर तालुक्यातील रांजणगाव MIDC पो स्टे चे अधिकारी म्हणून काम केलेले होते. वर्षभरापूर्वीच त्यांची बदली शिरूर पोलीस स्टेशन येथे झालेली होती. त्यांची बदली होताच पिंपरखेड येथे बँकेवर सशस्त्र व जबरी दरोडा पडलेला होता. त्याचा तपास व शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील इतरही काही तपासात शिरूर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे. केंद्रीय ग्रह विभागाचा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पो नि राऊत यांचे सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *