जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पिकाला दिलासादायक पाऊस

रामदास सांगळे
विभागीय संपादक
२१ ससेप्टेंबर २०२१

जुन्नर

मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम

जुन्नर  तालुक्याच्या पूर्व भागातील बेल्हे, राजुरी, गुळुंचवाडी, बांगरवाडी,वडगाव कांदळी, नगदवादी,साकोरी,निमगाव सावा,भोरवाडी,आळे,लवनवडी गावात पिकाला दिलासादायक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानच वातावरण दिसून येत आहे. तर काही गावांमध्ये हलक्‍या स्वरूपाच्या सरी कोसळल्या.पावसाळी कांदा लागवड केलेल्या पिकांना पावसाने यामुळे थोडा का होईना दिलासा मिळाला असल्याने बळीराजा सुखावला आहे.पाऊस नसल्याने बऱ्याच कांदा लागवडी रखडल्या होत्या.या दिलासादायक पावसाने तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी मोठ्या पावसाची सध्या गरज आहे.यंदा जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात अत्यल्प पाऊस झाला आहे.नद्या,पाझरतलाव तसेच बंधारे आद्यपही कोरडे ठाण आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून बळीराजाला पावसाची प्रतीक्षा होती. येन पावसाळ्यात चालू वर्षी पिकाला पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे तर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना सुद्धा पावसाने दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *