पालिकेत दिव्यांग महिला, तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह

१९ डिसेंबर २०२२

पिंपरी


पिंपरी-चिंचवड महापालिका व भवनात दिव्यांग महिला तसेच , तृतीयपंथीयांसाठी तळमजल्यावर स्वतंत्रपणे स्वच्छतागृह शौचालयाची सुविधा करण्यात आली आहे . त्याचे लोकार्पण महापालिका सहआयुक्त आशादेवी दुरगुडे यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी कनिष्ठ अभियंता दीपाली धेंडे , पल्लवी सासे , कर्मचारी विमल कांबळे , सुरेखा सोमवंशी , दिव्यांग कर्मचारी आशा लांडे , तृतीयपंथी सुरक्षारक्षक परी अडकणे , सिद्धी कुंभार आदी उपस्थित होते .पालिकेत काम करीत असलेल्या दिव्यांग तसच , तृतीयपंथी कर्मचार्यांसाठी व अभ्यागतांसाठी सुविधायुक्त शौचालयाची आवश्यकता विचारात घेता पालिका इमारतीच्या तळमजल्यावर स्वतंत्रपणे शौचालय तयार करण्यात आले आहे.

पालिका भवनाच्या तळमजल्यावर दिव्यांग बांधवांसाठी देखील स्वतंत्रपणे आवश्यक सुविधायुक्त शौचालय तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे . ते महिनाअखेरीस ते पूर्ण होईल , अशी माहिती कार्यकारी अभियंता शिरीष पोरेडी यांनी दिली . दिव्यांग बांधवांना पालिकेच्या विविध कार्यालयात सहजतेने पोहोचता यावे , यासाठी योग्य रॅम्प व्यवस्था असणे गरजेचे आहे . त्यादृष्टीनेही पालिका कार्यालय तसेच प्रेक्षागृह , दवाखाने , रुग्णालये , शाळा अशा महत्वाच्या ठिकाणी योग्य रॅम्प व्यवस्था तयार करण्यात आली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *