मराठवाडा जनविकास संघातर्फे एक हजार वृक्षांची लागवड, विद्यार्थ्यांना ध्वज वाटप

११ ऑगस्ट २०२२
पिंपरी प्रतिनिधी


भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने तुळजापूर बायपास रस्ता ते मोर्डा दरम्यान एक हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले. तुळजापूर बायपास रोड ते मोर्डा, धारूर गावापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी एक हजार वृक्षांचे रोपण करण्यात आले. महंत मावजीनाथ बाबा महाराज, महंत ईच्छागिरी महाराज, महंत व्यंकट अरण्य महाराज, तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष सचिनभैय्या रोचकरी, माजी नगराध्यक्ष पंडितराव जगदाळे, नगरसेवक विजय कंदले, ॲड. महेश गुंड, प्रगतिशील शेतकरी खंडूनाना नावडे, ह.भ.प. माऊली माहाराज विकास नीचळ, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ कोरे यांच्या हस्ते वृक्षांची पूजा करून वृक्षारोपण केले. तसेच वाडी बामणी येथील तुळजाई विद्यालयास ‘हर घर तिरंगा उत्सव देशाचा’ यानिमित 75 विद्यार्थ्यांना तिरंगा झेंड्याचे वाटप करण्यात आले आणि देशाविषयी अभिमान जागृत ठेवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तुळजाई विद्यालयातील विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबात जेवढे व्यक्ती तेवढे वृक्ष लागवड करण्यासाठी मार्गदर्शन करून 700 रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच वृक्ष लागवड, संगोपन करण्यासाठी शपथ देण्यात आली.


यावेळी तुळजाई विद्यालय वाडी-बामणी यांच्यावतीने अरुण पवार यांचा वृक्षमित्र म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी लोकसेवा फाउंडेशन तुळजापूरचे पंकज शहाणे, सामाजिक कार्यकर्ते जयसिंग पाटील, जीवन अमृतराव, जगदीश पाटील, जाधव सर, भंडारे साहेब, बापू ननवरे, रमेश कामटे, विजय पवार, विशाल पवार, नरवडे सर, महादेव गिराम, आण्णा राव, युवराज पांथरे, कल्याण नरवडे, संजय पारवे, काकासाहेब थिटे आदी मान्यवर उपस्थित होते. उद्योजक बालाजी पवार यांनी आभार मानले. यावेळी बोलताना महंत मावजीनाथ बाबा महाराज म्हणाले, की अरुण पवार यांचे सामाजिक कार्य सर्वांना प्रेरणादायी आहे. सचिन रोचकरी म्हणाले, की अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पवार बंधूनी पुणे व पिंपरी चिंचवड शहरात आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटविला असून, आपल्या गावकडेही त्यांचे पूर्णपणे लक्ष आहे. जयसिंग पाटील यांनी पवार बंधूंच्या सामाजिक कार्याचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.

 


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *