नशीब नोटांवर देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही; सुषमा अंधारे यांचा राम कदमांना टोला

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२८ ऑक्टोबर २०२२


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केली आहे. केजरीवाल यांच्या मागणीनंतर अनेक राजकीय नेत्यांनी महापुरुषांचा फोटो नोटेवर लावावा, अशी मागणी केली. भाजपाचे राम कदम यांनी भारतीय नोटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावावा, असं म्हटलं आहे. त्यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राम कदमांना टोला लगावला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, पृथ्वीचा आकार केवढा ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा, राम कदम विद्वान आहेत. नशीब देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापण्याची मागणी केली नाही. अंधभक्ती किती असावी, याचं हे उदाहरण आहे असेही सुषमा अंधरेंनी सांगितलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *