विराट रोहित वरून दोन चाहत्यांमध्ये दारुच्या नशेत खून खराबा

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१५ ऑक्टोबर २०२२


क्रिकेटपटूंची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. तर काही चाहते क्रिकेटरची देवासारखी पूजा करतात आणि त्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूबद्दल काहीही वाईट ऐकायला आवडत नाही. अनेकदा आवडत्या क्रिकेटपटूसाठी चाहते आपली हद्द पार करतात, पण तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यात रोहित शर्माच्या चाहत्याने विराटच्या आरसीबी टीमची खिल्ली उडवली. आरसीबीची चेष्टा केल्याचा राग आल्याने त्याच्या मित्राने त्याची हत्या केली. खून करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली असून तो पोलिसांच्या ताब्यात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही मित्र दारूच्या नशेत कोहली आणि रोहित यांच्यात वाद घालत होते. यादरम्यान आरोपी धर्मराजने त्याच्या मित्र विघ्नेशची हत्या केली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *