स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त शहर कॉंग्रेस कडून तिरंगा ध्वज वाटप

११ ऑगस्ट २०२२
पिंपरी प्रतिनिधी


अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी व सैनिकांनी त्यांच्या त्याग व बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. या बाबतीत कॉंग्रेस पक्ष आघाडीवर होता तसेच अनेक क्रांतिकारक ही कॉंग्रेस पक्षाचे सदस्य होते. कॉंग्रेस पक्षाच्या विचारांमुळे हा देश धर्मनिरपेक्ष आहे. पक्षाच्या धोरणात्मक निर्णयांमुळे देशाची प्रगती झालेली आहे. अशा आपल्या देशाचा ७५ व्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाप्रती प्रेम व अभिमान व्यक्त करण्यासाठी शहरातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तिरंगा झेंडा फडकताना दिसायला हवा म्हणून ७५००० तिरंगा झेंडा पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्याकडून शहरात वाटप करण्यात येणार आहे.

शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी, सैनिकांनी, समाजसुधारक व वीरगतीप्राप्त वीरांगना यांना स्मरण करण्यासाठी संकल्प तिरंगा ध्वज वाटप शहरात करण्यात येत असून सर्व समाजातील नागरिकांनी ध्वजाचे महत्व समजावे व मनामध्ये देशाबद्दल प्रेम व आदर निर्माण व्हावे. विविधतेत एकतेने नटलेल्या भारत देशाबद्दल बालकांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत व्हावी व यावर्षीचा ७५ वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन नागरिकांनी उत्साहात साजरा करावा याकरिता तिरंगा झेंडा वाटप करण्यात येत आहे. यावेळी माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेविका निगार बारस्कर, माजी नगरसेविका निर्मला कदम, खराळाई ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष आनंदा फडतरे, चंद्रशेखर हून्नशाळ, नारायण पाटुळे, शकुंतला सूर्यवंशी तसेच ज्येष्ठ नागरीक उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *