महिलांच्या विषयीच्या अनेक प्रश्नांवर उत्तर म्हणून मार्गदर्शन करणारे ‘वुमन बिईग’ पुस्तकाचे प्रकाशन

१० ऑगस्ट २०२२

पुणे 


महिलांच्या विषयावर कितीही लिखाण केलं तरी ते कमीच पडेल इतके प्रश्न महिलांचे असतात आयुष्य जगत असताना कसं राहावं, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, महिलांचे आरोग्य शारीरिक व मानसिक दृष्ट्या कसं असावं, इत्यादी आवश्यक गोष्टींचा अभ्यास पूर्ण समावेश मोजक्या शब्दात सांगायचा उत्तम प्रयत्न लेखिका सौ स्मिता जयकर यांनी या पुस्तकात केला आहे त्यांचे मी अभिनंदन व कौतुक करतो असे प्रतिपादन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले.

स्मिता कसमळकर लिखित ‘वुमन बिईंग पुस्तकाचे प्रकाशन

महिलांच्या विषयीच्या अनेक लहान मोठ्या प्रश्नांवर उत्तर म्हणून सल्ला तसेच मार्गदर्शन करण्यासाठी उपयुक्त असणारे वुमन बिईंग या सौ स्मिता कसळमकर यांच्या द्वारा लिखित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी आयुक्त गायकवाड बोलत होते. यावेळी व्यवसाय मार्गदर्शक श्री कृष्ण सावंत, पुला संचालिका सोनिया कोंजेती, आपला आवाज आपली सखी संचालिका संगीता तरडे, आदी मान्यवर तसेच कुटुंबीय नातेवाईक परिवार मित्रपरिवार व वाचक उपस्थित होते.

प्रत्येक क्षेत्रातील लोकांनी लेखन करावे आयुक्त शेखर गायकवाड यांचे अहवान

लेखिका स्मिता कसमळकर म्हणाल्या हे पुस्तक वीस वर्षाचा अनुभव व दोन वर्षाच्या अथक परिश्रमानंतर तयार झाले आहे या पुस्तकात महिलांच्या बाबतीत असलेले अनेक विषयांवर मंथन करून लिहिण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. तुम्हाला तो नक्की आवडेल खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण यांसारखे अनेकांनी या पुस्तकाचे कौतुक केले त्याबद्दल कसमळकर यांनी आभार मानले व प्रत्येक महिलेला हे पुस्तक वाचण्यासाठी आव्हान केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *