स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना मिठाई व शालेय साहित्य वाटप

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१० ऑगस्ट २०२२

पिंपरी


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सचिन साठे सोशल फाउंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मिठाई, शालेय साहित्य आणि तिरंग्याचे वाटप करण्यात आले. पिंपळे निलख येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत, पर्ल ड्रॉप हायस्कूल तसेच विशाल नगर आणि कस्पटे वस्ती येथील महानगरपालिकेच्या शाळेत, विशाल नगर मिल्की वे हायस्कूल या शाळांमध्ये एकूण सहा हजार विद्यार्थ्यांना मिठाई, शालेय साहित्य आणि तिरंग्याचे वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे, अशोक मेंगळे, माधव पुरी, बाळासाहेब कस्पटे, प्रवीण कस्पटे, प्रवीण पवार, संजय कदम, अमित कांबळे, विजय इंगवले, संतोष गायकवाड, गणेश आंत्रे, प्रसाद कांबळे तसेच मुख्याध्यापिका सुनिता टिळेकर, अनिल सुकाळे, प्रतिभा बनकर, संजय साठे, श्रद्धा देसकर, शिवाजी फिसके सर, सविता माने, सावंत सर आदी उपस्थित होते.

सचिन साठे सोशल फाउंडेशनचा पिंपळ निलख व विशाल नगर कस्पटे वस्ती येथे उपक्रम

यावेळी प्रास्ताविक करताना अशोक मेंगळे यांनी सांगितले की, सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली मागील वीस वर्षांपासून पिंपळे निलख, विशाल नगर, कस्पटे वस्ती वाकड या परिसरात विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा विषयक, आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यात आले आहेत.

यामध्ये प्रामुख्याने सामाजिक जनजागृती व्हावी या उद्देशाने जेष्ठ साहित्यिकांच्या व्याख्यानमालांचे आयोजन, दिवाळी पहाट सारखा उपक्रम, शालेय गुणवंतांचा गुणगौरव सोहळा, परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, कबड्डी, क्रिकेट तसेच शरीर सौष्ठव स्पर्धा, रक्तदान शिबिर, ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या आश्रमास मदत, परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना मदत असे विविध उपक्रम सचिन साठे यांनी यशस्वीपणे राबविले आहेत. सूत्र संचालन अमित कांबळे यांनी केले तर आभार माधव पुरी यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *