साई सूर्य नेत्रसेवेच्या 35 व्या वर्धापन दिनानिमित्त नेत्र रूग्णांना विजन एक्स्ट्रा या नव्या सेवेचा प्रारंभ आधुनिक उपचार पद्धतीत एक महिन्यापर्यंत आकर्षक सवलत आहे.प्रत्येक वर्षी नित्य नवे व अद्ययावत तंत्रज्ञान विकसित करत लाखो नेत्र रुग्णांना परिपूर्ण सेवा देणारे डॉक्टर प्रकाश कांकरिया आणि डॉक्टर सौ सुधा कांकरिया यांनी आपल्या साई सूर्य नेत्रसेवा या दालनाचा सुलौकिक देश-विदेशात वृद्धिंगत केला व 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी 36 व्या वर्षात यशस्वी पदार्पण करताना खऱ्या अर्थाने नेत्र रुग्णांना नेत्र दोषातून मुक्ती दिली आहे.
15 ऑगस्ट 1985 या स्वातंत्र्यदिनी डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी अहमदनगर येथे साई सूर्य नेत्र सेवा या संस्थेचा प्रारंभ केला.नेहमी नवीन आधुनिक तंत्रज्ञानाची साथ घेऊन त्यांनी नेत्र रुग्णांना अधिक चांगली दृष्टी देण्याचा प्रयत्न केला. नेत्र उपचारांमध्ये क्वांटूरा व्हिजन एक्स्ट्रा ही आधुनिक नेत्र उपचार पद्धती आहे. आत्तापर्यंतच्या लेसिक लेसर नेत्रशस्त्रक्रिया स्माईल व इतर दृष्टीदोष घालवण्याचा उपचारपद्धतीत डोळ्यांच्या बाहुलीच्या मध्यबिंदूवर केंद्रित लेसर किरणांचा उपचार केला जात असे परंतु आता क्वांटूरा एक्स्ट्रा लेसर उपचार पद्धतीने संपूर्ण बदल घडवून आणला असून आता दृष्टी बिंदु केंद्रित उपचार करता येतात.ही पद्धत सर्वात चांगली पद्धत म्हणून समजली जाते.हे ऑपरेशन तीन ते पाच मिनिटांत लेसर किरणांचा द्वारे केले जाते.
ऑपरेशन नंतर चार ते पाच दिवसात तुम्ही आपापल्या कामांना जाऊ शकता. भूगोलाच्या काही अनियमितता क्वांटूरा ने उपचार होत असल्यामुळे आता अशा रुग्णांचा नुसता चश्मा जात नाही तर चश्मा पेक्षाही अधिक विना चश्मा दिसू लागते.आता फक्त तरुणांनाच नाही तर नवीन तंत्रज्ञानामुळे चाळीशी नंतरही चष्मे व दृष्टी दोष आता घालवता येतात व नैसर्गिक दृष्टी प्राप्त होऊ शकते. चष्म्याचा नंबर घालवण्याच्या प्रचलित दल नासिक व नवीन स्माइल यापेक्षाही क्वांटूरा अधिक अचूक व परिणामकारक आहे. डॉक्टर कांकरिया यांचा क्वांटूरा उपचार पद्धतीचा अनुभव हा अतिशय मोठ्या प्रमाणात असून जागतिक सन्मानही त्यांना याबद्दल मिळाला आहे या उपचार पद्धतीचा खर्च मोठ्या प्रमाणात असतो परंतु साई सूर्य नेत्र सेवेच्या वर्धापन दिनानिमित्त नेत्र रुग्णांना एक महिन्याच्या कालावधीमध्ये आकर्षक सवलती मध्ये हा उपचार होत असल्याने अधिकाधिक नेत्र रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा. इच्छुक रुग्णांनी किंवा नातेवाईकांनी 88 88 98 22 22 किंवा 91 12 28 86 11 या हेल्पलाइनवर संपर्क करावा असे आवाहन प्रशासकीय अधिकारी श्री केदार व प्रिया सोनटक्के यांनी केले आहे.