राजुरीत एसटी व दुचाकीचा भीषण अपघात :दोघे जागीच ठार

जुन्नर (वार्ताहर-विभागीय संपादक रामदास सांगळे):- नगर- कल्याण महामार्गावरील राजुरी (ता.जुन्नर) बसस्थानका जवळ एसटी आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात होऊन दुचाकी वरील दोघांचा मृत्यू झाला आहे.

या अपघातात दुचाकी वरील मध्ये चेतन विजय गायकवाड (वय-२४ राहणार-बेल्हे,ता.जुन्नर) व दत्ता गंगाराम वाकळे (वय-२४, राहणार-सोनगाव,ता.राहुरी, जि. अहमदनगर) या दोघांचा मृत्यू झाला आहे. रविवार (दि.१८) रोजी सायंकाळी पाऊस चालू असताना हा अपघात झाला.

अपघात स्थळी फिरोज शकील चौगुले, रियाज इंनुस चौगुले मोहसीन सलीम सयद , अलिअहेमद मुनिर चौगुले,जुबेर बाबू चौगुले यांनी धाव घेतली. अलिअहेमद चौगुले यांनी अकबर भाई पठाण यांची रुग्णवाहिका बोलवून आळे येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *