शासन प्रमाणित सर्वज्ञ प्रकाशनातर्फे रस्त्यावर एक दिवस अभियान करून जास्तीत जास्त चालकांपर्यंत पोहचविले वाहतुकीचे नियम…

ओझर प्रतिनिधी: मंगेश शेळके

दि.११ जून २०२१ ( ओझर ): चालक जाग्रुती अभियान महाराष्ट्र शासन प्रमाणित सर्वज्ञ प्रकाशनातर्फे रस्त्यावर एक दिवस अभियान करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत वाहतुकीच्या नियमांचा अभ्यास पोहचविणे ,त्यांना अभ्यास करण्यास प्रव्रुत्त करणे , वाहतुकीच्या नियमांचे पालन करावयास सांगणे ,वाहतूक नियम कायदे कलम यांच्या अभ्यासाची माहिती देणे,वाहतूक नियम पायाभूत शिक्षण याची माहिती देणे .

चालकांमध्ये वाहतूक सुरक्षिततेबद्दल आवड निर्माण करणे.चालकांच्या जबाबदार्या व कर्तव्य याची माहिती देणे , हि सर्व माहिती ग्रामीण विभागात कानाकोपऱ्यात पोहचविणे असे या अभियानाचे उद्दीष्ट आहे.तसेच ड्रायव्हिंगचे नियम ,कायदेशीर माहिती, सुधारित ड्रायव्हिंग पद्धती, निर्णयात्मक ड्रायव्हिंग ,चालकाचे समज गैरसमज, चालकांच्या जबाबदार्या या व अशा अनेक गोष्टींचा अभ्यास चालकांपर्यंत पोहचविणे व चालकांना जाग्रूत करणे हा या अभियानामागचा उद्देश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *