खेड बायपास घाटात दरड कोसळण्याच्या शक्यतेच्या उपाययोजनाबाबत खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी प्रशासनाला दिले लेखी आदेश

रोहित खर्गे
विभागीय संपादक
०७ जुलै २०२२

खेड


पुणे नाशिक महामार्गावर खेड घाटाचा बायपास वाहतुकीसाठी धोकादायक आणि दरड कोसळण्याची भीती असून भविष्यात अपघात होऊन जीविहानी होण्याची भीती असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमात प्रसारित झाल्यानंतर त्याची दखल घेत शिरूर चे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी तात्काळ भारतीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांना लेखी पत्र देऊन काम करण्याबाबत सांगितले.

खेड घाटातील रस्त्यालगतच्या डोंगरावरून दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन त्या अनुषंगाने उपाय योजना करण्याची गरज होती. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित कंत्राटदार यांनी कोणतेही पाऊले उचलली नसल्याचे एका वृत्तवाहिनीच्या बातमीत म्हटले आहे त्यामुळे या ठिकाणी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. तरी आपण जातीने लक्ष घालून खेळ घाट बायपास रस्त्याची पाहणी करून रात्रीच्या उपायोजना करण्याबाबत प्राधान्याने कार्यवाही करावी असे आदेश खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिले


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *