श्री क्षेत्र भीमाशंकर श्रावणी सोमवार यात्रेसाठी वाहनतळ व मिनीबसचे नियोजन करावे – सारंग कोडोलकर

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
०७ जुलै २०२२

भिमाशंकर


श्री क्षेत्र भीमाशंकर श्रावणी सोमवार यात्रेसाठी वाहनतळ व मंदिराकडे जाण्यासाठी मिनीबसची व्यवस्था या दोन गोष्टी महत्वाच्या असून याचे योग्य नियोजन संबंधीत विभागांनी करावे अशा सुचना प्रांत अधिकारी सारंग कोडोलकर यांनी दिल्या. याबैठकीस श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष अँड.सुरेश कौदरे, उपकार्यकारी विश्वस्त मधुकर गवांदे, रत्नाकर कोडीलकर, तहसिलदार रमा जोशी, नायब तहसिलदार सचिन वाघ, सहायक पोलिस निरीक्षक घोडेगाव जिवन माने, खेड api आर.पी.लाड, उपअभियंता सुरेष पटाडे, महावितरणचे शैलेष गिते, माजी सरपंच मारूती लोहकरे इत्यादी उपस्थित होते.


कोविडची परिस्थिती कमी झाल्याने भीमाषंकर मध्ये सध्या दररोज मोठी र्गिर्द असते, हि गर्दि पहाता संपुर्ण श्रावण महिना गर्दि रहाणार आहे, हे लक्षात घेवून सर्व विभागांनी यात्रेचे नियोजन करावे. यावर्शी दि.29 जुलै ते दि.27 ऑगस्ट श्रावण महिना आहे. यात दि.31 जुलै व दि.7, 14, 21 ऑगस्ट असे चार श्रावणी सोमवार आले आहेत. तसेच दि. 13, 14, 15 व 16 अषा सलग चार दिवस सुट्टया आल्या आहेत, या चार दिवसात मोठी गर्दि असणार आहे. या सर्व गोश्टींचा विचार करून श्री क्षेत्र भीमाषंकद देवस्थान टस्ट व सर्व षासकिय विभागांनी यात्रेचे नियोजन करावे.


संपुर्ण श्रावण महिना गर्दि रहाणार असल्याने वाहनतळाची मोठी गरज पडणार आहे. यासाठी जुन्या वाहनतळांबरोबर नविन ठिकाणे निष्चीत करून तेथे व्यवस्था करून ठेवा. भीमाषंकर यात्रा नियोजन पहाणी दौ-यात या जागांची पहाणी करून जागा मालकांशी चर्चा करू. तसेच वाहनतळ ते मंदिर जाण्यासाठी रस्ता छोटा असल्याने मोठया गाडया जावून शकणार नाहीत. तसेच मंदिरा जवळ वाहनतळाची व्यवस्था नाही. यासाठी एसटि महामंडळाने मिनीबसची व्यवस्था करावी. एसटि महामंडळा बरोबरच पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या मिनीबस देखिल सांगाव्यात अषा सुचना प्रांत अधिकारी कोडोलकर यांनी दिल्या. याच बरोबर पेालिस बंदोबस्त, आरोग्य विभाग, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग यांचा आढावा घेण्यात आला. लवकरच भीमाषंकर मध्ये जावून प्रत्यक्ष यात्रेचे नियोजनाची पहाणी केली जाईल असे प्रांत अधिकारी यांनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *