माजी खासदार,शिवसेना उपनेते शिवाजी आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हाकालपट्टी

आपला आवाज न्यूज नेटवर्क
ब्रेकिंग न्यूज
दि.04/07/2022
अतुल परदेशी –  मुख्य संपादक

          शिवसेनेचे माजी खासदार शिवसेना उपनेते शिवाजी आढळराव पाटील यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना पक्षा मधून हाकलपट्टी करण्यात आली आहे अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध देण्यात आलेल्या पत्राद्वारे कळविण्यात आली आहे.


एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 20 जून पासून शिवसेनेमध्ये बंडाला सुरूवात झाली आणि जवळपास 40 विद्यमान आमदार हे शिंदे गाटाच्या बंडात सहभागी झाल्याने शिंदे गट आणि ठाकरे शिवसेना उशी परिस्थितीत निर्माण झाली आहे.महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिंदे गटाने भाजप च्या सहकार्याने सत्ता स्थापन करत मुख्यमंत्रीपदाची शपत एकनाथ शिंदे यांनी घेतली तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली.
          गेल्या आडीच वर्षा आधी राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले तेव्हा पासून स्थानिक निवडणूका आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे.महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मुळे शिवसेना पक्ष संपत असून कार्यकर्त्यांची घुसमट होत आहे हे जरी आज शिंदे गट म्हणत असला तरी या आधी पासून माजी खासदार शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अनेक वेळा जाहीर कार्यक्रमात पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना पक्ष संपवण्याचे काम करीत आहे असे विधान केले होते.मात्र आज ज्या वेळी शिंदे गटाने महाविकास आघाडीच्या विरोधात बंड करून ठाकरे सेनेला खिंडार पाडले आहे ते पाहता महाराष्ट्रात शिंदे गटाची ताकद वाढली आहे हे स्पष्ट झाले असल्याचे अनेक आजी माजी आमदार हे शिंदे गाटाला समर्थन देत असल्याचे चित्र समोर येत आहे.याचाच एक भाग म्हणून माजी खासदार आढळराव पाटील यांनी ही शिंदे गाटाचे समर्थन करत ठाकरे सेनेवर नाराजी व्यक्त केल्याची माहीती समोर येत असून पक्ष विरोधी काम केल्याचा ठपका आढळराव पाटील यांच्यावर ठेवत त्यांची ठाकरे यांच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

दरम्यान आढळराव पाटील यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असल्याची बातमी समोर आली असली तर त्यांच्या हकालपट्टी संदर्भात दैनिक सामना मध्ये छापून आलेली बातमी ही अनवधाने छापण्यात आली असल्याचा खुलासा शिवसेना सचिव खा.विनायक राऊत यांनी केले असल्याचे पत्रही समोर आले आहे.या संपुर्ण घडामोडी बाबत आढळराव पाटील यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *