राष्ट्रीय पातळीवरील अबकस स्पर्धेमध्ये स्वरुप भरत नागरेचे यश

नारायणगाव :- (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
कोल्हापुर येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील प्रो एक्टिव्ह अबकस स्पर्धेमध्ये स्वरूप भरत नागरे या विद्यार्थ्याने तीसरा क्रमांक मिळविला. प्रो एक्टिव्ह कंपनीतर्फे त्याचा ट्रॉफी देऊन नुकताच सत्कार करण्यात आला. पुणे येथे पार पडलेल्या रिजनल अबकस स्पर्धेमध्ये त्यांने दुसरा क्रमांक पटकावाला होता. त्यातुन त्याची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली होती. स्वरुप हा मुळचा सरंबा जिल्हा बुलढाणा येथील असुन तो नारायणगाव येथील श्रीमती एस आर केदारी बालक मंदिर शाळेचा विद्यार्थी आहे.


स्वरुप नारायणगाव येथील काईट अकेडमी येथे विनोद बडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अबकस चे शिक्षण घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *