राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत पिंपरी चिंचवड च्या खेळाडू अमिषा पाटील आणि अनुजा मोरे ची चमकदार कामगिरी, मुंबई संघ प्रथम

रोहित खर्गे
विभागीय संपादक
७ नोव्हेंबर २०२१

पिंपरी


टेनिस क्रिकेट अससोसिएशन ऑफ इंडिया आयोजित ६ वी राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धा मथुरा (उत्तर प्रदेश ) येथे नुकत्याच पार पडल्या. या राष्ट्रीय स्पर्धेत पिंपरी चिंचवडच्या अमिषा पाटील आणि अनुजा मोरे यांची मुंबई संघात निवड झाली होती.

महिल्यांच्या एकूण १० संघानी सहभाग घेतला होता.

मुंबई संघानी मध्य प्रदेश , उत्तर प्रदेश , आंध्र प्रदेश , छत्तीसगढ ,दमण या सर्व संघाना हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

उपांत्य फेरीसाठी ओडिशा या संघा बरोबर लढत झाली . ओडिशाने नाणे फेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचे निर्णय घेतला आणि 10 षटकात 66 धावा केल्या . मुंबई संघाकडून वैष्णवी महाशाळकर आणि काजल निकाळजे ह्यांनी चांगली फलंदाजी केली . वैष्णवीने 40 धावा आणि काजलने 15 नाबाद धावा केल्या . अनुजा मोरे , दिव्या मणिकम , प्रिया सिंग ह्यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केले . अमिषा पाटील आणि श्रुती पांडे, प्रांजळ कोंढरे , श्वेता साळुंखे , ऋतिका पाटील , श्रुतिका पाटील ह्यांनी उत्कृष्ट क्षेत्र रक्षण केले.

Pimpri Chinchwad's Amisha Patil and Anuja More's brilliant performance in National Tennis Cricket Tournament, Mumbai team first
राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत पिंपरी चिंचवड च्या खेळाडू अमिषा पाटील आणि अनुजा मोरे ची चमकदार कामगिरी, मुंबई संघ प्रथम

अंतिम सामान्या साठी मुंबई संघाची धडक महाराष्ट्र संघाबरोबर झाली . महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला . महाराष्ट्र संघाने 41 धावांचा लक्ष्य मुंबई संघाना दिले होते . मुंबई संघाकडून काजल निकाळजे 2 गडी बाद ,अनुजा मोरे 1, दिव्या मणिकम 1 , वैष्णवी महाशालकर 1 , प्रिया सिंग 1 गडी बाद केले आहेत.
अमिषा पाटील 14 धावा , काजल निकाळजे 12 , प्रिया सिंग 8 धावा करत विजय मिळवला आहे . मुंबई संघला डॉ डी वाय पाटील स्कूलचे क्रीडा शिक्षक पार्वती बाकळेची निवड झाली व संघाला त्यांचे मार्गदर्शन लाभले.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरणावेळी टेनिस क्रिकेट अससोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष कनिया गुजर , सचिव रिंटू मित्रा तसेच टेनिस क्रिकेट अससोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे महासचिव मीनाक्षी गिरी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट अससोसिएशनचे पदाधिकारी उपमहापौर तुषार हिंगे , मृदुला महाजन , सुनीता फडके , ऐश्वर्या साठे ह्यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *