महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या जुन्नर तालुका अध्यक्षपदी अनिता गुंजाळ तर सचिवपदी मीरा तळपे

जुन्नर । प्रतिनिधी, 

दि. ३ जुलै २०२२,

                  जुन्नर प्रकल्पतील सर्व सेविका, मिनी सेविका, मदतनीस यांचा संघटनात्मक मेळावा दि. 2 जुलै 2022 रोजी सकाळी 11वाजता कोंडाजी बाबा डेरे आश्रम जुन्नर या ठिकाणी पार पडला.
सण 1986 साली एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प जुन्नर ची निर्मिती झाली. प्रकल्प अंतर्गत लहान मुलांचे कुपोषण निर्मूलन व्हावे म्हणून अंगणवाडी सेविका, मिनी सेविका, मदतनीस यांची नेमणूक करण्यात आली.


                   प्रकल्प निर्मिती मध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सुरवातीला 50रू मानधन होते. संघर्ष करून सद्या त्यांचे मानधन 8250रू झाले अल्पशा मानधनात काम करावे लागत होते. अंगणवाडी कर्मचारी एकत्र येऊन कॉम्रेड एम. ए पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली कॉम्रेड ब्रिजपाल सिंग व कॉम्रेड व्ही डी दातखिळे तसेच सविंद्रा बोऱ्हाडे यांच्या सहकार्याने जुन्नर तालुक्यात महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ तयार करून पायाभरणी केली. एक एक महिलांना जोडत संघटनेचा बालेकिल्ला जुन्नर प्रकल्पत तयार करण्यात आला. जुन्नर प्रकल्प मेळाव्याच्या निमित्ताने अंगणवाडी कर्मचारी यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, मानधन वाढ करा, पेन्शन योजना लागू करा, आजारपणाची रजा द्या,  मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रात रूपांतर करणे, लहान मुलांना चांगल्या प्रतीचा आहार द्या, अमृता आहारातील दरवाढ करा, आशा अनेक अत्यंत महत्वाच्या विषयवार संघटनात्मक चर्चा करण्यात आली. अंगणवाडी कर्मचारी यांना शासकीय सेवेत वर्ग करून स्पे स्केल लागू करण्याबाबत औद्योगिक न्यायालय पुणे येथे केस घालण्यात आली आहे.
                  आदीवासी भागातील पेसा अंतर्गत ए.पी.जे. अमृत आहार देण्यात येतो. महागाईच्या दृष्टीने शासना कडून दरवाढ न झाल्यामुळे दि. 1 ऑगस्ट 2022 पासून लाभार्थी यांना वाटप न करण्याचा निर्णय अंगणवाडी कर्मचारी यांनी घेतला आहे. अंगणवाडी कर्मचारी यांच्या मागण्यासाठी केंद्र व शासन स्तरावर या पुढे अनेक लढे देण्याबाबत संघर्ष करण्याचा निर्धार करण्यात आला. कोव्हीड 19 मध्ये अंगणवाडी कर्मचारी यांनी स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता कोव्हीड चे जिगरीने काम केले. समाजामध्ये उल्लेखनीय काम करून स्वतःला सिद्ध करून दाखवले आहे. मेळाव्याच्या निमित्ताने नवीन प्रतिनिधी ची नेमणूक करण्यात आली. तालुका अध्यक्ष पदी अनिताताई गुंजाळ तर तालुका सचिव पदी मीराताई तळपे यांची नेमणूक करण्यात आली आहे. संघटनात्मक सोशल मीडिया प्रतिनिधी म्हणून किशोरी खंडागळे यांची नेमणूक करण्यात आली. तसेच काही बिट मध्ये नवीन बिट प्रतिनिधीची देखील नेमणूक करण्यात आली.
                  भारतीय महिला फेडरेशन तालुका प्रतिनिधी म्हणून सविंद्रा ताई बोऱ्हाडे, शैलेजा कोऱ्हाळे, शोभा डुंबरे, मालती नवले यांची नेमणूक करण्यात आली आहे. अंगणवाडी केंद्रातील लाभार्थी यांची पटसंख्या वाढवी तसेच लहान मुलांचे कुपोषण निर्मूलन करावे व पूर्व प्राथमिक शिक्षण लहान मुलांना देण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी सातत्याने प्रयत्न करतील. गरम व ताजा आहारापासून लाभार्थी वंचित राहणार नाही या बाबत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघांचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड निलेश दातखिळे व जिल्हा अध्यक्ष सविंद्रा बोऱ्हाडे यांनी उपस्थित अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

                मेळाव्याचे सूत्रसंचालन सोनाली हांडे यांनी केले. केंद्र सरकारने व महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन जगण्या इतके वेतन द्यावे अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांची आहे.
शैलेजा कोऱ्हाळे, अनिता थोरात, रंजना देवाडे, रंजना गायकवाड, राजश्री शेळकंदे, नंदा गायकवाड, विदया ढोले, अरुणा दुराफे, वनिता ढोले,  गुलाब वाबळे,  स्मिता वाघुले. पुलावती थोरवे, शिला मातेले, गंगुबाई साबळे, मीना चकवे, रोहिणी गवारी, तसेच सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिस मोठ्या संखेने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *