भीमाशंकर तीर्थक्षेत्र व परिसरामध्ये येणाऱ्या भाविकांना त्रास देणाऱ्या तृतीयपंथी यावर घोडेगाव पोलिसांकडून कारवाई

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
१४ जून २०२२

भीमाशंकर


भीमाशंकर तीर्थक्षेत्र व परिसरामध्ये येणाऱ्या भाविकांना त्रास देणाऱ्या तृतीयपंथी यावर घोडेगाव पोलिसांच्या कडून कारवाई करण्यात आली आहे.शनिवारी व रविवारी भीमाशंकर या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येत असतात. नेमका याच संधीचा फायदा घेऊन अनेक तृतीयपंथी तेथे भाविकांना त्रास देऊन त्यांच्याकडून पैसे घेत असतात व पैसे दिले नाही तर आरडाओरडा करून गोंधळ घालतात व शिव्या शाप देतात. तृतीयपंथी यांच्या सदर प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मधून तक्रारी आल्या होत्या. सदर तक्रारीच्या अनुषंगाने घोडेगाव पोलिसांच्या कडून सदर परिसरात गस्त घालून कारवाई करण्यात आल्याची माहिती घोडेगावचे साहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी दिली.

तृतीयपंथी सागर लक्ष्मण लोहकरे वय ३० वर्ष रा. राजपुर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे याने तळेकर ग्रामपंचायत कार्यालयासमोर भिमाशंकर मंदिर कडे जाणारे रोडवर थांबून येणाऱ्या जाणाऱ्या सर्व गाड्या थांबवून टाळ्या वाजवून थांबवलेल्या प्रत्येक वाहन चालकाकडून पैसे घेऊन त्यावेळी सार्वजनिक रहदारीस /वाहतुकीस अडथळा करून मोठमोठ्याने आरडाओरडा करून सार्वजनिक शांतता भंग करत होता. याबाबत त्याच्या विरोधात कोणी सर्वसामान्य नागरिक बोलले तर तो पोलिस तृतीयपंथीयांना काही करू शकत नाही असे सांगून अरेरावी करत असे. यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी स्वतः तक्रार देऊन सागर लोहकरे याला मा. घोडेगाव न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला आर्थिक दंडाची शिक्षा दिली आहे.

घोडेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने सर्व नागरिकांना व भाविकांना आवाहन करण्यात येते की भीमाशंकर तीर्थक्षेत्र या ठिकाणी कोणीही जर सर्वसामान्य नागरिकांना भाविकांना त्रास देत असेल तर त्याबाबत पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची पोलीस प्रशासनाकडून पुरेपूर दक्षता घेतली जाईल व त्रास देणारे इसमांवरही कठोर कारवाई केली जाईल.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *