पोलीस अवैद्य धंद्यावर कारवाईला गेल्यानंतर याबाबतची माहिती अवैध व्यावसायिकांना देणाऱ्यावर घोडेगाव पोलिसांची कारवाई

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
१४ जून २०२२

घोडेगाव


रविवारी दि. १२ जून रोजी घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने हे तळेघर पोलीस दूरक्षेत्र हद्दीत अवैद्य दारू विक्रेत्यांच्यावर कारवाईसाठी गेले असता तळेघर गावाच्या सुरुवातीला पानटपरी चालवणारा व्यक्ती गणेश इस्टे, राहणार तळेघर हा पोलीस गाडी पाहताच संबंधित दारू विक्रेते इसम यांना सावध करीत होता. सदरचा प्रकार वारंवार होत असल्यामुळे पोलिसांना विनाकारण हेलपाटा बसत होता व दारू विक्री त्यांच्यावर कारवाई मध्ये अडथळा येत होता. त्यामुळे सदर इस्माबाबत खात्री पटवून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

गणेश ईस्टे या इसमास घोडेगाव न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाकडून त्याला आर्थिक दंड करण्यात आला आहे यानंतर अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या इसमांच्या वर व अवैध व्यवसायांवर कारवाई करताना पोलिसांची माहिती अवैध व्यावसायीकांना देणाऱ्या इस माणसावर याच्यापेक्षा कठोर स्वरूपाची कारवाई घोडेगाव पोलीस यांच्याकडून करण्यात येणार असल्याची माहिती घोडेगावचे साहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिली. तसेच पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नागरिकांनी अवैद्य दारू विक्री व इतर अवैध व्यवसाय याबाबत गोपनीय माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे व व आपल्या परिसरातील अवैध व्यवसाय समोर नाश करण्यामध्ये आपण नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडावे असे आवाहन घोडेगाव पोलीसांकडून करण्यात येत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *