युवक काँग्रेस कडून अर्णव गोस्वामीचा जोडे मारून निषेध…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी दि. १९,
समाजमाध्यमांमध्ये बीएआरसी चे पूर्व प्रमुख पाथों दास गुप्ता आणि रिपब्लिक चॅनलचे प्रमुख अर्णव गोस्वामी यांचे व्हाट्सअप वरील चॅट व्हायरल झालेले आहेत. यामध्ये अर्णव याने सैनिकांवरिल झालेल्या हल्ल्यांबाबतीत आनंद व्यक्त केल्याच्या व देश विरोधी भूमिका घेतल्याच्या निषेधार्थ आज पिंपरी चिचंवड शहर जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने अर्णव गोस्वामी व भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला. या प्रसंगी अर्णव गोस्वामी च्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

युवक काँग्रेस च्या वतीने पिंपरी चौकात या बाबत हातात निषेध फलक घेऊन व झेंडे घेऊन निदर्शने करण्यात आली. या वेळी अर्णव गोस्वामी मुर्दाबाद, भाजपा का दलाल मुर्दाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद, भाजपा सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या.

याप्रसंगी बोलताना युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, “हे सर्व अत्यंत धक्कादायक असून त्यामधून टीआरपी घोटाळ्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि मोदी सरकारचा हात असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाने आणि मोदी सरकारने तात्काळ स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी युवक काँग्रेस च्या वतीने करत आहोत. अर्णव याने तर आपण भाजपाचे गुलाम व दलालच असल्याचे दर्शवून दिले आहे व देशाची गोपनीय माहीती त्याला मिळतेच कशी ? या प्रकरणातून पुन्हा एकदा भाजपा चा खरा चेहरा देशासमोर आला आहे, तसेच हा मोठा गंभीर स्वरूपातील चौकशी करण्याचा प्रश्न देशाला पडला आहे याची उच्च स्तरिय चौकशी करून संबंधितांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, असे बनसोडे म्हणाले.

या प्रसंगी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय जैन, शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, शहर उपाध्यक्ष शशीकांत शिंदे, शहर सरचिटणीस शंकर ढोरे, रोहन वाघमारे, अपूर्वा इंगवले, विरेंद्र गायकवाड, मिंलिद बनसोडे, विशाल सरवदे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, राहूल शिंदे, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष नासीर चौधरी, चिचंवड विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष सौरभ शिंदे, गौरव लोंढ