शिरूर येथे अवैध सावकारकी करणाऱ्यास अटक

रवींद्र खुडे
विभागीय संपादक 
०५ एप्रिल २०२२

शिरूर


शिक्रापूर येथील व्यावसायिक सुरेश काशिनाथ भुजबळ, वय ५३ वर्ष यांनी दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी, शिरूर येथील सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे तक्रार अर्ज दाखल केलेला होता. भुजबळ यांच्या तक्रार अर्जात म्हटल्याप्रमाणे, शिरूर येथील व्यावसायिक सतीश उत्तमचंद संघवी, राहणार आनंद हाऊसिंग सोसायटी शिरूर, यांनी तक्रारदाराला सन २०१३ रोजी अवैधरीत्या व्याजाने पैसे देऊन, जमीन नावावर करून अपहार केलेला असल्याचे म्हटलेले होते. या तक्रार अर्जाची चाचपणी सहाय्यक निबंधक कार्यालयाने केली असता, त्या तक्रारीत त्यांना तथ्य आढळल्याने जिल्हा उपनिबंधक मिलिंद सोबले यांच्या मार्गदर्शनाखाली, शिरूरचे सहाय्यक निबंधक एस एस कुंभार यांच्या सुचनांनुसार, कार्यालयीन प्रतिनिधी म्हणून गजानन पुंड, सरकारी अधिकारी श्रेणी २, यांनी रीतसर शिरूर पोलिसांकडे या अपहाराची फिर्याद दिल्याने, सतीश संघवीवर १ एप्रिल २०२२ रोजी सावकारी नियमन २०१४ चे कलम ३९ नुसार, भा द वी कलम ५०६ नुसार गुन्हा दाखल केलेला असून, अधिक चौकशीसाठी संघविला अटक करण्यात आलेली होती. त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवल्यानंतर, सोमवार दि. ४ एप्रिल २०२२ रोजी शिरूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने, त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आल्याचे, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत व पोलीस उप निरीक्षक अभिजित पवार यांनी सांगितले.

या प्रकरणाचा पुढील अधिक तपास, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या सुचनांनुसार, पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार व टीम करत आहेत. या कामगिरीत पोलीस हवालदार गणेश देशमाने, पोलीस अंमलदार राजेंद्र गोपाळे, पोलीस अंमलदार संतोष साळुंके, महिला पोलीस अंमलदार प्रतिमा नवले, तसेच सहकार विभागातील आप्पासाहेब धायगुडे, प्रशांत पीसाळ यांनी सहभाग घेतला होता. तसेच, जर कुणाच्या अशा फसवणुकी होत असतील, तर त्यांनी पोलिसांत तक्रारी करण्याचे आवाहनही पोलीस विभागामार्फत करण्यात आलेले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *