आळेफाटा पोलिसांची दबंग कारवाई १ लाख ४४ हजार रुपयांचा अवैध दारू जप्त:-तिघांवर गुन्हा दाखल

जुन्नर (वार्ताहर):विभागीय संपादक रामदास सांगळे,
आळेफाटा पोलिसांनी दबंग कारवाई करत पिंपळवंडी (ता.जुन्नर) गावच्या बस स्टॅन्ड परिसरामध्ये दोन ठिकाणी अवैध दारू साठ्यावर छापा टाकलाय. सदर कारवाई मध्ये एका ठिकाणाहून ९२ हजार रुपयांचा तर दुसऱ्या ठिकाणाहून ५२ हजार रुपयांचा असा एकूण १ लाख ४४ हजार रुपयांचा अवैध दारू साठा जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये ऑफिसर चॉईस, रॉयल स्टॅग, मॅकडॉल नंबर 1, इम्पेरियल ब्ल्यू, जी. एम., डॉक्टर ब्रांडी, डी. एस. पी. ब्लॅक, रॉयल चॅलेंज असे देशी-विदेशी दारू चे एकूण ४२ बॉक्स तसेच २५ हजार रुपयांचे साहित्य असा एकूण १ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याप्रमाणे एकूण ३ आरोपीवर गुन्हा दाखल कारवाई करण्यात असल्याची माहिती आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक टी. वाय.मुजावर यांनी दिली.

सदरची कामगिरी आळेफाटा पोलीस ठाणे चे पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर, सहायक फौजदार सतीश घाडगे, पो.ना.नारायण बर्डे, पो.ना.नरेंद्र गोराणे, पो. शि.गोविंद केंद्रे, पो.शि.किशोर कोरडे, पो.शि.निलेश करे, पो.शि.दीपक गर्जे, पो.शि. मोहन आनंदगावकर, पो.शि. मुरूमकर, पो.शि. वैद्य, पो.शि. सचिन डामसे, पो.शि.किशोर कुलकर्णी, महिला. पो. शि. ज्योती दहिफळे, पो.शि वैद्य, तडवी, मुरूमकर, यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *