नारायणगाव महाविद्यालयात जिल्हास्तरीय जल – साक्षरता कार्य शाळा उत्साहात संपन्न

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
२८ मार्च २०२२

नारायणगाव


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत ग्रामोन्नती मंडळाचे, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय नारायणगाव, District 3131 W.A.S.H. Team आणि रोटरी क्लब नारायणगाव हायवे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरीय एक दिवसीय जलसाक्षरता कार्यशाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन रो. सतीश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्राचार्य डॉ.मिलिंद भुजबळ (ए.बी.एम.कॉलेज नारायणगाव), रो. डॉ. शिवाजी टाकळकर (अध्यक्ष रोटरी क्लब नारायणगाव हायवे) व महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.जी. बी.होले उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. सध्या वातावरणामध्ये होणारे बदल, याचे कारण मानवी विकास साध्य करताना निसर्गाचा -हास होतोय, आज पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे आणि दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे असे मत रो.सतीश खाडे यांनी कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

नारायणगाव महाविद्यालयाचे इतिहास तज्ञ डॉ.लहु गायकवाड यांनी शिवकालीन जल नियोजन व विकास या वर प्रकाश टाकून आजच्या एकविसाव्या शतकातील जल नियोजनाची सद्यस्थिती या अनुषंगाने जल नियोजनाच्या विषयी मार्गदर्शन केले. कार्यशाळेत दुपारच्या सत्रात सहभागी मुख्य वक्ते, वनरक्षक रमेश खरमाळे यांनी पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाण्याचा योग्य वापर व नियोजन करणे हीच काळाची गरज आहे. आजचे औद्योगिकीकरण मानवी जीवनावर विपरित परिणाम करत आहे असे सांगितले. समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष रो. डॉ. पंजाब कथे (डायरेक्टर कम्युनिटी डेव्हलपमेंट) यांनी आपल्या मनोगतामध्ये पाण्याचे महत्त्व व सध्याच्या काळात पाण्याचा होणारा चुकीचा व अति वापर टाळला पाहिजे, असे मत व्यक्त केले. या कार्यशाळेत राष्ट्रीय सेवा योजनेमधील पुणे जिल्ह्याच्या विविध महाविद्यालयातील सुमारे २५० स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकारी यांनी उस्फूर्त सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.जी.बी.होले यांनी केले. पाहुण्यांची ओळख व सत्कार डॉ.श्रीकांत फुलसुंदर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैशाली मोढवे यांनी केले. तर कार्यशाळेत आयोजित रांगोळी स्पर्धा व बुलेटीन बोर्ड स्पर्धेचे आयोजन व नियोजन प्रा. अश्विनी गायकवाड आणि प्रा. निकिता कुऱ्हाडे यांनी केले. या कार्यशाळेत मनोज हाडवळे (जुन्नर कृषी पर्यटन ),प्रविण मोरे, मनोज वर्मा, रो. शामराव थोरात, रो. रविंद्र वाजगे, मीना नदी स्वच्छता अभियान प्रवक्ते दिपक वारूळे, हाय स्पीड कॉम्प्युटर नारायणगावचे दिलीप भगत, सचिन पांडे , नारायणगाव सोसायटीचे उपाध्यक्ष किरण वाजगे, रामभाऊ सातपुते इत्यादी मान्यवरांनी विविध विषयांवर जलसाक्षरतेच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.

कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक पुणे ग्रामीणचे प्रा. डॉ. श्रीकांत फुलसुंदर कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल कांबळे, प्रा. वैशाली मोडवे, प्रा.श्वेता वाघमारे, प्रा.ओंकार मेहेर, प्रा.अश्विनी गायकवाड प्रा. सौरभ जाधव, प्रा. मयूर मोरे प्रा.निकिता कुर्‍हाडे व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रा. श्वेता वाघमारे यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *