बिबट सफारीसाठी वन विभागाकडून जुन्नर तालुक्यातील विविध जागांची पाहणी

अतुल परदेशी
मुख्य संपादक
२८ मार्च २०२२

जुन्नर


बिबट सफारी प्रकल्पासाठी जुन्नर तालुक्यातील विविध भागांची प्राथमिक पाहणी वन विभागाच्या वतीने सुरू आहे. आज आंबेगव्हाण आणि परिसरातील ३ ते ४ ठिकाणांची पाहणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत केली.

वन विभाग कर्मचारी यांच्या सोबत आमदार अतुल बेनके उपस्थित

बिबट्याचा नैसर्गिक अधिवास असणारा हा भाग आहे. याभागाच्या भौगोलिक परिस्थितीची पाहणी करत असताना याभागाची विस्तृत माहिती घेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याचप्रमाणे जिओग्राफीकल मॅपिंगद्वारे देखील काही भागांचा आढावा घेण्यात आला. यावेळी आंबेगव्हाण, पाचघर, चिल्हेवाडी, रोहोकडी, अहिनवेवाडी, खामुंडी, डुंबरवाडी, ओतूर या पंचक्रोशीतील ग्रामपंचायतींच्या व विविध संस्थांच्या वतीने बिबट सफारी प्रकल्पाच्या समर्थनार्थ निवेदन पत्रं देण्यात आली.

बिबट सफारी प्रकल्प समर्थनार्थ विविध ग्रामपंचायतीनी समर्थन पत्र आमदार अतुल बेनके यांना दिले…

या प्रसंगी जि. प. सदस्य अंकुश आमले, मोहित ढमाले, सभापती विशाल तांबे, बबनराव घोलप, आंबेगव्हाण, ओतूर सह पंचक्रोशीतील विविध गावचे सरपंच, RFO काकडे, जुन्नर पर्यटनचे यश म्हसकरे, शेखर नलावडे, वनविभागाचे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *