शिरोली सुलतानपूर येथे ऊसतोड सांगता समारंभात ऊस वाहनांची डीजे लावून मिरवणूक

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
१४ मे २०२२

शिरोली


शिरोली-सुलतानपुर (ता.जुन्नर) येथे विघ्नहर सहकारी साखर कारखाना जुन्नर-आंबेगाव च्या चालु वर्षाच्या सांगता समारंभ ऊस वाहतुकदार व ऊसतोड कामगार यांनी १० वाहनांची गावच्या इतिहासात सर्वात मोठी मिरवणूक काढली व डीजेच्या तालावर भंडारा, गुलाल उधळन करत मनसोक्त आनंद लुटला.

गावच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी मिरवणूक

गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून सुरु झालेला हा सिझन ऊस वाहतूक गाड्या भरून ऊस वाहतुकदार व तोड कामगार,मुकादम यांनी साजरा केला. गेली आठ महिन्यापासुन भल्या पहाटे उठून दिवसरात काम करणाऱ्या कामगार वर्गाल कोणतेही सन ,उत्सव,लग्न समारंभ यांस मुकावे लागते.या सर्व कार्यक्रमणां मुकावे लागत असल्याने या कामगार वर्गाने देखील आनंद लुटावा या भावनेतुन या ठिकाणी मोठ्या संख्येने तोड कामगार व वाहतुकदार यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम व त्यानंतर भोजन असे नियोजन केल्याचे अविनाश डावखर व माऊली डावखर यांनी सांगितले.

हा आनंद उत्सव शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस ट्रक्टर, ट्रक मध्ये भरल्यापासुन सुरु झाला तर हा उत्सव कारखान्याला माल पोच होईपर्यंत सुरु राहणार असल्याचे कामगारांनी सांगितले,या उत्सवात लहान मुलांपासुन तर वयस्कर व्यक्ति सर्व जन देहभान विसरून डीजे च्या तालावर थिरकताना दिसत होते,या वेळी पाचशे हुन अधिक ऊस तोड कामगार व वाहतुकदार तसच शेतकरी उपस्थित झाल्याने शिरोली सुलतानपुर भागाला यात्रेचे स्वरूप आले होते.या वेळी गावचे सरपंच जयशिंग गुंजाळ,दगडु डावखरे, माऊली डावखरे,अविनाश डावखर,पंढरीनाथ डावखर, अनिल पाटील, युवराज पाटील कारखान्याचे शेतकी अधिकारी उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *