चाकण येथील मर्सिडिज कंपनीत बिबट्या शिरल्याने खळबळ

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२१ मार्च २०२२

चाकण


बिबटे पाणी आणि भक्ष्याच्या शोधात जंगलात वावरत असतात. अशातच शहराजवळील झाडी असलेल्या गावांमध्येही हल्ली सगळीकडे सिमेंटची जंगल झाल्याचे पाहायला मिळते. मानवाने अगदी टेकड्या, डोंगर खोदून जंगलात राहण्यासाठी वास्तव्य केले. बिबट्यांनी चुकून आशा मानवी वस्तीत प्रवेश केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.


अशीच एक घटना आज सोमवार दि २१ मार्च रोजी पुण्याजवळील चाकण एमआयडीसी मधील मर्सिडीज कंपनीत बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज पहाटेच्या सुमारास बिबट्या कंपनीत शिरला असल्याचं काही नागरिकांनी पाहिलं, त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली, पोलिसांनी खबरदारी म्हणून वनविभागाला माहिती दिली आहे. मर्सिडीज कंपनीतील बॉडी शॉप येथे बिबट्या असल्याची माहिती चाकण पोलिसांनी दिलीय. बिबट्या पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून तेथील कामगारांना इजा होऊ नये म्हणून बाहेर काढण्यात आले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *