निमगावात ३२ वर्षानंतर सत्ता पालट; निमगावात ग्रामविकास शेतकरी सहकारी पॅनेलचे वर्चस्व

रामदास सांगळे
विभागीय संपादक
२१ मार्च २०२२ 

निमगाव सावा


निमगाव सावा (ता.जुन्नर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत गेली ३२ वर्षे सत्ता असणाऱ्या जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शैनेश्वर ग्राम विकास पॅनलचा जुन्नर तालुका शिव सहकार संघटनेचे संघटक व ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर घाडगे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुरस्कृत ग्रामविकास शेतकरी सहकारी पॅनेलने धुव्वा उडवत एकूण १३ जागांपैकी ९ जागा जिंकून निर्विवाद विजय मिळवला. ३२ वर्ष असलेली सत्ता गेल्याने पवार यांना गाडगे मोठा धक्का दिला आहे.

या सोसायटीच्या निवडणुकीचे विशेष म्हणजे शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीची सभासद संख्या मोठी होती. त्यामुळे विजय आपलाच या भ्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राहिले. त्यात भाजपने शिवसेने सोबत असलेला घरोबा तोडून राष्ट्रवादीशी युती केली. याचा राग शिवसैनिकांन बरोबर राष्ट्रवादीच्या मतदारांनाही होता. ही खदखद मतदारांनी मतदानातून दाखवून दिल्याने भास्कर गाडगे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास शेतकरी पॅनलच्या यशाचा मार्ग सुकर झाला. या अटीतटीच्या निवडणुकीत १३ जागांसाठी मतदान झाले असून ७६४ मतदारांपैकी ७१४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ग्रामविकास शेतकरी पॅनेलचे आशुतोष गाडगे, प्रकाश गाडगे, सोपान गाडगे, ज्ञानदेव काटे, ताराबाई गाडगे, प्रमिला गाडगे, संदीप बोऱ्हाडे, सुनील जावळे, बबन घोडे हे नऊ उमेदवार विजयी झाले तर पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शैनेश्वर ग्रामविकास पॅनल चे रामदास गाडगे, रामदास मते, श्रीहरी भालेराव व परशुराम लगड हे चार उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत ग्रामविकास शेतकरी सहकारी पॅनलला भरयोग मतांनी निवडून दिल्याबद्दल पॅनल प्रमुख भास्कर गाडगे यांनी कार्यकर्ते मतदारांचे आभार मानले.

१)पांडुरंग पवार यांना स्वतःच्या गावात धक्का.
२)पवार यांची सोसायटीवरील ३२ वर्षाची सत्ता गेली.
३)शिवसेनेने मिळवली एकहाती सत्ता
४)सत्ता आल्याने गावातील शिवसैनिकांमध्ये उत्साह वाढला.
५)दोन्ही पॅनलने केला होता जोरदार प्रचार


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *