वसंतदादा पाटील नागरी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध | अध्यक्षपदी दीपक खैरे, उपाध्यक्षपदी राजेंद्र पाटे तर सचिव पदी सदानंद खैरे यांची निवड…

वसंतदादा पाटील नागरी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

अध्यक्षपदी दीपक खैरे, उपाध्यक्षपदी राजेंद्र पाटे तर सचिव पदी सदानंद खैरे यांची निवड

नारायणगाव :- (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या व जुन्नर तालुक्यातील महत्त्वाची आर्थिक उलाढाल होत असलेल्या नारायणगाव येथील वसंतदादा पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. सन २०२३ – २४ ते सन २०२८ – २९ या पंचवार्षिक सालाकरीता ही निवडणूक घेण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी सचिन सरसमकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.
या पंचवार्षिक निवडणुकी पश्चात संचालक मंडळाच्या संमतीने अध्यक्षपदी दीपक अशोकआप्पा खैरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी राजेंद्र पांडुरंग पाटे तर सचिवपदी सदानंद बबनराव खैरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
दरम्यान संचालक म्हणून विलास वाजगे, प्रभाकर तट्टू, अशोक पाटे, संग्राम फुलवडे, एकनाथ शेटे, सुनील भुजबळ, प्रशांत अशोकआप्पा खैरे, डॉ. पंकज वाव्हळ, डॉ. रवींद्र गिरी, अभय कोठारी, मीना भोर व रूपाली पाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नवीन पदाधिकाऱ्यांचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन सरसमकर, संतोष भुजबळ यांच्यासह संस्थापक गणपतराव फुलवडे, संस्थेचे मार्गदर्शक संतोष नाना खैरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन तोडकरी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *