ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय व प्राधिकरण विचार मंचतर्फ़े महिलांना बांबूपासून वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण

दि. १९/०१/२०२३

पिंपरी

 

निगडी : ज्ञान प्रबोधिनी, नवनगर विद्यालय व प्राधिकरण विचार मंच निगडीतर्फ़े मंगळवार 17 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 ते 5:30 या वेळेत महिलांना  बांबूपासून वस्तू बनवण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने की होल्डर, राखी, महिलांच्या कानातले, महिलांच्या गळ्यातील हार, पणती ठेवायचे स्टॅन्ड  अशा अनेक वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण महिलांनी या शिबिरामधून घेतले.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी ज्ञान प्रबोधिनीचे केंद्रप्रमुख  मनोज देवळेकर, यशवंत लिमये तसेच पालक महासंघाचे अध्यक्ष नितीन गावडे व मनसे शहर उपाध्यक्ष बाळा दानवले,  प्राधिकरण महिला विचार मंच अध्यक्ष स्वाती दानवले व प्रशिक्षण देणाऱ्या सर्व महिला वर्ग उपस्थित होत्या. यावेळी महिलांनी मनोगत व्यक्त करताना भविष्यात या प्रशिक्षणाचा आम्हाला नक्कीच फायदा होईल असे उदगार काढून ज्ञानप्रबोधिनी शाळेचे व प्राधिकरण विचार मंच यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *