ना नोकरी, ना छोकरी एमपीएससी च्या तयारीतच गेले तरुणपण

पिंपरी प्रतिनिधी
०४ ऑक्टोबर २०२२


शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे .. विविध पदांसाठी हजाराच्या घरात पदांची भरती निघतात . त्यात परीक्षेचा पॅटर्न वरचेवर बदलत असतो . त्यांचा फटका जुन्या विद्यार्थ्यांना बसतो . त्यामुळे तयारीतच काही उमेदवारांची वयाची तिशी ओलांडते . परिणामी त्यांच्या सामाजिक जीवनावर परिणाम होत असल्याचे आहे . पुणे , पिंपरी चिंचवड शहरात राज्यातील मुले तयारी करण्यासाठी येतात . मात्र वैयक्तिक कारणांसह काही तांत्रिक कारणांमुळे अनेकांना तयारी करूनही यश मिळत नाही.

अभ्यास कधी सुरू करावा ? स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कधी सुरू करावा , हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो . उमेदवारांनी मात्र पदवीचे शिक्षण चांगल्या प्रकारे घ्यावे . पदवी चांगल्या मार्कानी मिळवली तर आपल्या विषयात प्रवीण होतो. आपल्या क्षमता ओळखून पदवीसह किंवी पदवीनंतर स्पर्धा परीक्षेस सुरुवात करावी. किती वर्षे करावे प्रयत्न ? स्पर्धा परीक्षेस सुरुवात करण्यापूर्वी हव्या असलेल्या पदाबाबत सर्व माहिती घ्यावी . त्यातील तांत्रिक अडचणी, आपल्या क्षमतांचा विचार करावा . त्यानंतर सुरुवात केली तर आपली होणारी प्रगती किती आहे, याचा आढावा घेत राहावा . कमीत कमी वर्षात , घरची स्थिती व मानसिक स्थिती ओळखून मार्गक्रमण करीत राहवे . नाहीतर वेळीच थांबून दुसरा पर्याय निवडावा.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *