सफाई महिला कर्मचारी,परिचारिका,आशावर्कर यांच्यावर हेलीकॉप्टर ने पुष्पवृष्टी

अतुल परदेशी
मुख्य संपादक
०८ मार्च २०२२

पिंपरी-चिंचवड


८ मार्च जागतीक महिलादिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक तथा अ प्रभाग समिती सभापती शैलेश उर्फ शैलेंद्र मोरे यांनी पालिकेतील सफाई महिला कर्मचारी,परिचारिका,आशावर्कर यांच्यावर हेलीकॉप्टर ने ८ मार्च रोजी दुपारी १२ वाजता पिंपरी-चिंचवड येथील डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या मागील मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या महिलांवर पुष्पवृष्टी करत कृतज्ञता व्यक्त केली.

नगरसेवक शैलेश उर्फ शैलेंद्र मोरे यांचा अनोखा उपक्रम

८ मार्च जागतीक महिलादिना निमित्ताने जगभरात अनेक वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून महिलांचा सन्मान करण्यात येतो मात्र पिंपरी-चिंचवड येथील नगरसेवक शैलेश उर्फ शैलेंद्र मोरे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सफाई महिला कामगार,परिचारिका,आशावर्कर यांच्यावर हेलीकॉप्टर ने पुष्पवृषुटी केल्याने त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.


आमच्या प्रतिनिधींनी ज्या महिलांवर हेलीकॉप्टर ने पुष्पवृष्टी करण्यात आली त्यांच्या आणि ज्यांची ही संकल्पना होती ते आयोजक नगरसेवक शैलेश उर्फ शैलेंद्र मोरे यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता आमचा आनंद गगनात मावेनासा झालाय आमच्या बद्ल नगरसेवक शैलेश भाऊ मोरे यांनी जी भावना व्यक्त करत पुष्पवृष्टी केली ती आयुष्यभर स्मरणात राहील अशा भावना व्यक्त केल्या तर आयोजक नगरसेवक शैलेश मोरे म्हणाले मागील कोवीड च्या दोन वर्षांच्या काळात डाॅक्टर,पोलीस,सफाई कर्मचारी महिला,आशावर्कर अनेक सामाजिक संस्था या सर्वानी स्वतःच्याच जिवाची पर्वा न करता जे काम केले आहे त्यांच्या रूनातून कधीच उतरायू होता येणार नाही म्हणून ८ मार्च जागतीक महिलादिनाचे औचित्य साधून हेलीकॉप्टर ने पालिकेतील महिला सफाई कर्ममचारी,परिचारिका,आशावर्कर,तसेच पिंपरी-चिंचवड मधील महिलांचे संघटन आपला आवाज आपली सखी च्या सभासद महिलांवर पुष्पवृष्टी करावी असा विचार मनात आला आणि आजतो पर्ण झाल्याने मनस्वी समाधान आणि आनंद होत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *