गुजरात चा CM जर PM होऊ शकतो,तर महाराष्ट्राचा का नाही ? – संजय राऊत

पुणे
दि. २६ सप्टेंबर २०२१
अतुल परदेशी – मुख्य संपादक

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर होते. ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना विचारले असता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना खोचक टोला लगावत उत्तर दिलं आहे.

राऊत म्हणाले ” महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठा असतो म्हणून तो देशाचा नेता असतो, आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली ला गेले अमित शहांना भेटले, मला अनेकांनी प्रश्न केला, उद्धव ठाकरे दिल्ली ला गेले ? मी म्हटलो हो दिल्ली बघायला गेले. मुख्यमंत्री अमित शहा सोबत दिल्लीत जेवन करीत आहे, चंद्रकात पाटील तुम्ही कुठे आहात ? ” असा सवालही राऊत यांनी केला.

गुजरात चा मुख्यमंत्री PM होऊ शकतो तर महाराष्ट्राचा का नाही होऊ शकत ? असा सवाल संजय राऊत यांनी पुणे येथील वडगाव शेरी येथे शिवसेना मेळाव्यात बोलतांना व्यक्त केला. ” नंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील, भाजप ठाकरे सरकारचा ‘ बाल ही बाका ‘ करू शकत नाही ” असा इशाराही संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे.
सध्या राज्य सरकारच्या अस्थिरतेबाबत सुरू असलेल्या चर्चेवर ही संजय राऊत यांनी भाष्य केलं ” महाविकास आघाडी आहे त्यामुळे भांड्याला भांडे लागणारच परंतु सरकार स्थिर आहे. ” असे स्पष्ट केले.

नारायण राणे यांचाही समाचार घेत आमच्या नादी लागू नका, अटक करून दाखवलीच ना ! असे राणे यांना सुनावले.
चंद्रकात पाटील यांच्यावर सव्वा रूपयांचा दावा दाखल केला यावर बोलताना संजय राऊत म्हणाले मी आज पर्यंत कोणताच दावा हरलो नाही मग तो राजकारणातला असो की कोर्टातला असो सव्वा रूपयांचा दावाही मी जिंकणारच आणि हा सव्वा रुपया चंद्रकात पाटलांना मला द्यावाच लागणार असेही भाकीत राऊत यांनी केले.

शिवसेनेचा जन्म हा रस्त्यावर झाला आहे. आमच्यावर अनेक संकट आली परंतु आम्ही भयभीत झालो नाही. राहुल गांधी यांनी मला ह्या यशाचे रहस्य विचारले मी म्हटलो शिवसेना म्हणजे फटे लेकिन हटे नही. असे राऊत म्हणाले.
पुणे महापालिकेवर भविष्यात भगवा फडकला पाहिजे यासाठी कामाला लागा, असा सल्ला संजय राऊत यांनी कार्यकर्त्या दिला आहे. एकमेकांवर तोंडसुख घेणाऱ्या राजकीय मंडळींमुळे आगामी महानगरपालिका निवडणुका गजतील येवढं मात्र नक्की आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *