पोलिसांना धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तंटामुक्ती अध्यक्षांच्या मुलावर गुन्हा दाखल

सदानंद शेवाळे
ब्यूरो चीफ,आंबेगाव
२ नोव्हेंबर २०२१

घोडेगाव


घोडेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेले शिनोली ता. आंबेगाव जिल्हा पुणे येथे जमिनीवरून दोन गटात झालेला वाद मिटवण्यासाठी गेलेले पोलिसांना शिवीगाळ दमदाटी करून पोलिसांची कॉलर पकडत धक्काबुक्की केल्याप्रकरणी घोडेगाव पोलिस ठाण्यात गणेश ज्ञानेश्वर बोऱ्हाडे वय ३० राहणार शिनोली ता. आंबेगाव जि. पुणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस शिपाई अतिश काळे यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक ३०/१०/२०२१ रोजी गावच्या हद्दीत जमीन गट नंबर २६२ मध्ये जमिनीच्या वादातून सुरू असलेल्या दोन गटातील भांडणे सोडविण्यासाठी पोलीस हवालदार सुरकुले व पोलीस शिपाई अतिश काळे हे गेले असता त्या ठिकाणी गणेश ज्ञानेश्वर बोऱ्हाडे रा. शिनोली ता. आंबेगाव जिल्हा पुणे यांनी शासकीय कामात अडथळा आणून मी कोण आहे तुला माहीत आहे का असे म्हणत फिर्यादी पोलीस शिपाई यांची शर्टाची कॉलर पकडून त्यांना शिवीगाळ धक्काबुक्की करत मारहाण केली आहे. याबाबत फिर्यादी काळे यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर डोले करत आहे.

पोलीस शिपाई अतिश कारभारी काळे यांच्या फिर्यादी वरून गणेश बोऱ्हाडे यांच्या विरोधात घोडेगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल…

——————
घोडेगाव पोस्टे गु.र.नं 245/2021 भा.द.वि.क. 353 ,332,186,504,506
——————————-
फिर्यादी- अतिश कारभारी काळे, वय 26 वर्षे, पोलीस शिपाई, ब.न.2178, नेमणुक – घोडेगाव पोलीस स्टेशन मो.न. 8552877100
———————————–
आरोपी- गणेश ज्ञानेश्वर बो-हाडे वय 30 वर्षे रा.शिनोली ता. आंबेगाव जि.पुणे
————————————–
गु.घ.ता.वेऴ.व ठिकाण- 31/10/2021 रोजी 13/00 वा चे सुमारास मौजे शिनोली ता.आंबेगाव जि.पुणे गावचे हद्दीत जमीन गट.नं.262 मध्ये.
————————————-
गु.दा.ता.वेऴ.व ठिकाण- दि. 31/10/2021 रोजी 19/08 वाजता नोंद क्र 23/2021
————————————-
सारंश-वर नमुद केले तारखेस वेऴी व ठिकाणी यातील फिर्यादी यांनी फिर्याद दिली कि दि, 31/10/2021 रोजी 13/00 वा चे सुमारास मौजे शिनोली ता.आंबेगाव जि.पुणे गावचे हद्दीत जमीन गट.नं.262 मध्ये मी व श्री.सुरकुले पो.हवा.ब.न.872 असे शासकीय गणवेशात दोन गटात झालेली भांडणे सोडविण्याचा प्रयत्न करत आमचे शासकीय कर्तव्य पार पाडत असताना इसम नामे गणेश ज्ञानेश्वर बो-हाडे वय 30 वर्षे रा. शिनोली ता. आंबेगाव जि.पुणे याने आम्हाला शिविगाळ, दमदाटी करुन मी परिधान केलेल्या शासकीय गणवेशाचे शर्टची कॉलर धरुन मला धक्काबुक्की करुन हाताने माझे तोंडावर, मानेवर मारहाण करुन आम्ही करत असलेले शासकीय कर्तव्य करणेपासुन आम्हाला धाकाने परावृत्त केले आहे. म्हणुन माझी त्याचे विरुध्द भा.द.वि.क. 353 ,332, 186, 504, 506 प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे.वगैरे मजकुरावरुन दाखल करुन सदर गुन्हयाचा पुढील तपास वरिष्ठांचे आदेशाने पोसई डौले सो, हे करत आहेत
दाखल अंमलदार – सहा फौज बकरे मोनं- 9822791736
—————————
तपासी अंमलदार – पोसई डौले सो, मो नं – 9665431415.
————————–
प्रभारी अधिकारी – सपोनि माने सो, मो नं – 8652874434

पोलीस शिपाई अतिश कारभारी काळे यांच्या फिर्यादी वरून गणेश बोऱ्हाडे यांच्या विरोधात घोडेगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल…

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *