कांद्याच्या पिकात अफूचे अंतर्गत पीक घेणारा जेरबंद

कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी
०९ मार्च २०२२

ओतूर


जास्त पैसे मिळविण्याचा हव्यास असलेला माणूस कधीच स्वस्थ बसत नाही,झटपट खूप पैसे मिळतील या लालसेने झपाटलेल्या एकाने कांद्याच्या पिकात खूप पैसे मिळवून देणारे अंतर्गत पीक म्हणून अफूच्या झाडांची लागवड केल्यामुळे एकास अटक करण्यात आल्याची माहिती ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली.

सदर घटना धोलवड ( ता.जुन्नर) गावच्या हद्दीत गट नं १०८६ येथे घडली असून वडील विठ्ठल सखाराम नलावडे यांचे नावे असलेल्या शेतजमिनीत त्यांचा मुलगा महादेव विठ्ठल नलावडे (वय ५३) याने कांदा पिकाची लागवड केली असून सोबत बेकायदेशीररित्या अफूचे (एकूण झाडे ८१) असे अंतर्गत पीकाची लागवड केली आहे.झाडांना एकूण १८३ अफूची बोंडे लगडलेली दिसून येत असून सर्व झाडांसहीत बोंडाचे वजन १३.१४२ की. ग्रा.इतके आहे. आजच्या बाजारभावा प्रमाणे जप्त केलेल्या अफूची किंमत सुमारे ८५ हजार ४२३ रुपये इतकी आहे.मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणाऱ्या अफूची लागवड करणे कायदेशीर गुन्हा असल्याने ओतूर पोलिसांनी प्रभावी पदार्थ अधिनियम कायदा १९८५ चे कलम ८,१५,१८,३२,४६ नुसार गुन्हा नोंद करून आरोपी महादेव विठ्ठल नलावडे यास मुद्देमालासह अटक केली आहे.


या घटनेची फिर्याद पोलीस शिपाई वाल्मिक शिंगोटे यांनी दिली असून पुढील तपास ओतूर पोलीस स्टेशनं चे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल केरूरकर हे करीत आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *