जे टीका करतात ते आपल्या कर्माने संपतात – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत

रोहित खर्गे
विभागीय संपादक
१८ फेब्रुवारी २०२२

पिंपरी


जे टीका करतात ते आपल्या कर्माने संपतात. मी टीका करणारा मंत्री नाही. कुणावर टीका ही करीत नाही. टीका करणाऱ्याना उत्तरही देत नाही. टीका करत देशात वातावरण निर्मिती करतात फिरतात ते कोकणात निवडणुकीत पडतात. असा असा टोला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नारायण राणे यांचे नाव न घेता लगावत पुढे ते म्हणाले कि, मी काही चुकत असेल तर माझ्या विधानसभेत उभे राहून निवडून येवून दाखवा.असे खुले आव्हान दिले. शब्द (पब्लिसिटी)संस्थेच्या वतीने कोरोना काळात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्राइड ऑफ़ महाराष्ट्र पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम पिंपरी येथील आयपीएस कॅंपसमध्ये संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, शहर संघटक संतोष सौंदणकर, पुरस्कार सोहळ्याचे मुख्य आयोजक शब्द पब्लिसिटीचे संचालक शिवाजी घोडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी नगरसेविका शैलजा मोरे,  उद्योजक दीपक कुदळे, उद्योजक संतोष बारणे,सामाजिक कार्यकर्ते गणेश सस्ते, विकास साने, उद्योजक अनिल कुलकर्णी,जयदेव अक्कलकोटे, लक्ष्मण कांबळे, हृदयरोग तज्ञ डॉ अभिषेक करमाळकर,डॉ विकेश मुथा, अस्थीरोग तज्ञ डॉ.प्रशांत टोणपे,डॉ प्रसाद भाटे,डॉ विजय सातव,कर्करोगडॉ पद्मजा गरूड व डॉ. प्रकाश गरुड,डॉ विनायक शिंदे, हभप जगन्नाथ काटे,दिलीप सोनीगरा, सचिन सानप, डॉ प्रकाश दिवाकरन, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, मुख शल्यचिकित्सक डॉ यशवंत इंगळे, नगरसेविका अनुराधा गोरखे यांना प्राइड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ना मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले कि, परवाच सावित्रीबाई फुले पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी विद्यापीठास निधी देवू असे आश्वासन दिले होते.४८ तासांच्या आत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अध्यासन केंद्रास ३ कोटी देण्याचा ठराव मंत्री मंडळात संमत करण्यात आला. सत्कार दोन प्रकारचे असतात.एक आदर्शवत सत्कार तर मते घेवून सत्ता काबीज करण्यासाठी सत्कार करवून घेतात. माझ्या राजकीय कारकिर्दीत पत्रकारांचे मोठे योगदान आहे. हल्ली तर पत्रकारांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार वाढले आहे. हि आपली संस्कृती नाही.हे कुठेतरी थांबले पाहिजेत. जांभेकर, टिळक यांनी पत्रकारितेचा एक उत्तम आदर्श घालून दिला आहे. यावेळी कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले कि,कोरोना काळात अध्यापन करणे मोठे आव्हान होते. तरीदेखील कुठेही खंड न पडता ज्ञानदानाचे कार्य सुरू ठेवले.हा कार्यक्रम सामाजिक बांधिलकी जोपासणारा सोहळा आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शब्द पब्लिसिटीचे संचालक शिवाजी घोडे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा संतोष पाचपुते तर आभार धनश्री घोडे हिने मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *